तळा : संध्या पिंगळे
तळा तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून पुन्हा एकदा सर्वच्या सर्व दोन जि.प.व चार पं.स. उमेदवार विजयी होत पं.समिती वरती आता राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा झेंडा फडकला आहे. जि.प.व पं.स.च्या 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 43 चरई खर्द जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या गिताताई जाधव यांना 6783 मते मिळाली तर शिवसेनेच्या अस्मिता शिगवण यांना 1529 मते मिळाली व शे.का.प. च्या करूणा पातेरे यांना 229 मते मिळाली यामधे राष्ट्रवादीच्या गिता जाधव या उमेदवार 5254 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
44 रहाटाड जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या नलिनी नरेंद्र लोखंडे यांना 5098 मते मिळाली तर शिवसेनेच्या रोहिणी रमेश पिंपळे यांना 2770 मते मिळाली असून राष्ट्रवादीच्या नलिनी लोंखडे या उमेदवार 2328 मतांनी विजयी झाल्या आहेत. 85 बोरघरहवेली पंचायत समिती गटात राष्ट्रवादीचे रविंद्र गणपत मांडवकर यांना 3625 मते मिळाली तर शिवसेनेचे अनंत वामन खराडे यांना 381 मते मिळाली व अपक्ष संतोष नामदेव आमले यांना 466 मते मिळाली या लढतीत राष्ट्रवादीचे रविंद्र मांडवकर हे उमेदवार 3159 मतांनी विजयी झाले आहेत.
पंचायत समिती 86 चरई खुर्द गणात राष्ट्रवादीच्या अक्षरा सचिन कदम यांना 2787 मते मिळाली तर शिवसेनेच्या सुलभा संतोष काप यांना 1214 मते मिळाली असून यामधे राष्ट्रवादीच्या अक्षरा कदम या उमेदवार 1573 मतांनी विजयी झाल्या आहेत. 87 रहाटाड पं.स. गणात राष्ट्रवादीचे नथुराम भिवा मुकण यांना 2277 मते मिळाली तर शिवसेनेचे चंद्रकांत विठ्ठल मुकण यांना 1388 मते मिळाली आहेत. यामधे राष्ट्रवादीचे नथुराम मुकण हे उमेदवार 889 मतांनी विजयी झाले आहेत. 88 रहाटाड पं.स.गणात राष्ट्रवादीच्या रूपाली जगन्नाथ तांडेल यांना 2993 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या रोशनी रमेश तांदळेकर यांना 1182 मते मिळाली असून यामधे राष्ट्रवादीच्या उमेदवार रूपाली तांडेल या 1811 मतांनी विजयी झाल्या आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या विजयी उमेदवारांची घोषणा करताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत सर्व विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नाना भौड, महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,पक्षाचे पदाधिकारी उत्तम जाधव, देवा रामाणे, प्रविण आंबार्ले, विठोबा साबळे, दिलीप घाणेकर, रामदास मोरे, दामोदर काते, निकीता गायकवाड, नागेश लोखंडे, आदी उपस्थित होते. या जिल्हा परिषद निवडणुकीत गिताताई जाधव या सलग तीन वेळा त्याच जिल्हा परिषद मतदार संघातून विजयी होत हॅटट्रिक पूर्ण केली आहे.एक अभ्यासू व जिल्हा परिषदेतील महत्वाची समाजकल्याण व महिला बालविकास या सभातीपदांचा अनुभव असणाऱ्या गिता जाधव यांचा तिसऱ्यांदा विजय हा कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे. यावेळी दोन जि.प व चार पंचायत समिती गणात 634 नोटाला मतदान पडले आहे.