Ekanth Shinde News Pudhari
रायगड

Tala Taluka Development: तळा तालुक्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध; उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांची ग्वाही

तळा तालुक्यातील दुर्गम बोरीचामाळ येथे श्री देवी लक्ष्मीनारायण मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले.

पुढारी वृत्तसेवा

संध्या पिंगळे

तळा: तळा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असून,विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली.

तळा तालुक्यातील दुर्गम बोरीचामाळ येथे श्री देवी लक्ष्मीनारायण मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. या सोहळ्यास मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार तुकाराम काते, जिल्हाधिकारी कीसन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, लीलाधर खातू यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देत मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद व्यक्त केला. “मंदिर म्हणजे पावित्र्य आणि मंगलमय वातावरण. हे पावित्र्य जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या मंदिरामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, समृद्धी वाढेल आणि नागरिकांचे आरोग्य सुधारेल,” असे त्यांनी सांगितले.

तळा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच बोरीचामाळ पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली. “तळा नगरपंचायत आणि बोरीचामाळच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू देणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी विकासाबाबत सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली.

यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मनोगतात तळा तालुक्यात उद्योगधंदे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण विश्वासाने पार पाडेन, असे ते म्हणाले.

दरम्यान, दुर्गम भागातील बोरीचामाळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

आम्ही घेणारे नाही, तर देणारे आहोत

महिलांसाठी सुरू केलेल्या ‌‘लाडकी बहीण‌’ योजनेचा उल्लेख करत, ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या बहिणींसाठी ती कायम सुरू राहील. आम्ही घेणारे नाही, तर देणारे आहोत,असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT