Summer Wedding Delay Issues Pudhari
रायगड

Summer Wedding Delay Issues: वैशाख वणव्याचा चटका आणि टळणारे विवाह मुहूर्त; वऱ्हाडी मंडळीना होतोय मनस्ताप

कुणी ऐकायच्या मनस्थितीत नाही

पुढारी वृत्तसेवा

खोपोली: ऐन वैशाखात उन्हाचा पारा चढू लागलाय,त्यात सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू आहे.परंतु कुठलाही विवाह सोहळा वेळेवर होत नसल्याने होत नाही. वेळेचे योग्य नियोजन न झाल्याने वऱ्हाडी मंडळींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विवाहाची तारीख व वेळ काढण्याचा हट्ट मात्र ठरलेला असतो.मात्र लग्न वेळेवर होत नसल्यामुळे डोकेदुखी ठरत आहे.दिवसामध्ये दोन ते तीन लग्न मुहूर्त असतातच यामुळे अनेक व-हाडी यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाचा पारा चढत असतानाही तरुणाई डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत बेभानपणे नाचताना दिसत असल्याचे चित्र सरासरी पहावयास मिळत आहे.

सकाळी असो अथवा सायंकाळी लग्न वेळेवर लागत नाही, आलेल्या पाहुण्यांना तोंड देताना वधुपित्याच्या नाकीदम येताना दिसत आहे. त्यातच आलेल्या मान्यवरांचे सत्कार, फेटे, हारतुरे यातच वेळ निघून जातो. त्यानंतर मंगलाष्टक सुरू होतात. शुभमुहूर्त हा वधूवरांच्या भावी आयुष्यात कामी येत असतो.परंतू असे असतानाही लग्न वेळेवर लागत नसल्याने उपस्थितांमधून तीव्र नाराजी उमटू लागली आहे.

मुहूर्त काढत असताना तर लग्न वेळेवर लावावेत अन्यथा शुभमुहूर्ताला काहीच अर्थ उरत नाही.असे लग्न मंडपात आलेले पाहुणे मंडळी चर्चेला उधाण येत असल्याचे सरासरी ऐकण्यास मिळत आहे.

कुणी ऐकायच्या मनस्थितीत नाही

हल्लीच्या काळात लग्न हा एक इव्हेन्टच झालाय. तरुणाईला या लग्नात हौसमौज करायची असते. काही वर्षांपूर्वी लग्न सोहळा हा एक विधी म्हणून पाहिला जात असे. पण काळ बदलला तसे रितीरिवाज, रुढी परंपराही बदलत गेल्या.

पूर्वी पौरोहित्य म्हणेल तसे ऐकले जायचे. पण आता त्याचाच मान राखला जात नाही. मुहूर्ताची वेळ समीप आली आहे.वधुवरांना घेऊन व्यासपीठावर यावे, असे वारंवार सांगूनही कुणीच त्याकडे लक्ष देत नाही. मग तुम्ही याल तेव्हा अक्षता टाकू, अशीच भूमिका पौरोहित्य मंडळी घेतात. मग त्यात मुहूर्तच नसतोच. असे प्रकार आता सर्वत्र घडू लागलेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT