Konkan Railway Konkan Railway Social Media Account
रायगड

Konkan Railway Summer Special Trains | उन्हाळी सुट्टीत कोकणवासियांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव गाडी सोडणार

मध्य रेल्वेद्वारे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवल्या जाणार, अतिरिक्त १२० विशेष गाड्यांचे मागणीनुसार (TOD) नियोजन

पुढारी वृत्तसेवा

रोहे : कोकणवाशीयांसाठी मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव व लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्यां सोडणार आहेत. यासह मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध गंतव्यस्थानांसाठी '२०१२ उन्हाळी विशेष गाड्या' चालवणार आहे.याव्यतिरिक्त, आणखी १२० विशेष गाड्या मागणीनुसार (TOD) चालवण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्यां ट्रेन क्रमांक 01171 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १६.०४.२०२६ ते ११.०६.२०२६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (९ सेवा) ट्रेन क्रमांक 01172 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १६.०४.२०२६ ते ११.०६.२०२६ या कालावधीत मडगाव येथून दर गुरुवारी १६.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवि आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत. मडगाव -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्यां ट्रेन क्रमांक 01119 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १७.०४.२०२६ ते १२.०६.२०२६ या कालावधीत, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शुक्रवारी ००.५५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल. (९ सेवा)ट्रेन क्रमांक 01120 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक १७.०४.२०२६ ते १२.०६.२०२६ या कालावधीत, मडगाव येथून दर शुक्रवारी १६.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. (९ सेवा) या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले आहेत.

यासह मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई गोरखपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष गाड्या, दादर- बलिया दादर त्रि-साप्ताहिक विशेष गाड्या, दादर गोरखपूर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस समस्तीपूर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस बनारस लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष गाड्या, लोकमान्य टिळक टर्मिनस दानापूर लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष गाडी, लोकमान्य टिळक टर्मिनस सोलापूर लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाड्या, पुणे कोल्हापूर पुणे दैनिक विशेष गाड्या, पुणे गोरखपूर हडपसर दैनिक विशेष गाड्या, पुणे गाझीपूर सिटी हडपसर द्विसाप्ताहिक विशेष, पुणे दानापूर हडपसर दैनिक विशेष, पुणे नागपूर हडपसर साप्ताहिक विशेष गाडी, पुणे नागपूर हडपसर साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी, दौंड कलबुरगि दौंड अनारक्षित विशेष गाडी, दौंड-कलबुरगी दौंड अनारक्षित द्वि-साप्ताहिक विशेष गाडी, हडपसर हरंगुळ हडपसर दैनिक विशेष गाड्या,सोलापूर दौंड सोलापूर दैनिक विशेष गाड्या,सोलापूर कलबुरगि सोलापूर दैनिक विशेष गाड्या,सोलापूर अनकपल्ले सोलापूर साप्ताहिक विशेष, बडनेरा नाशिक रोड बडनेरा दैनिक विशेष गाड्या, नागपूर मडगाव नागपूर द्वि साप्ताहिक विशेष गाड्या या गाड्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT