रायगडमधील 3 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार  File Photo
रायगड

State Teacher Award | रायगडमधील 3 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार

पुढारी वृत्तसेवा

रायगड : समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणार्‍या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणार्‍या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार दरवर्षी 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी प्रदान करण्यात येतात.

यंदा या पूरस्काराकरिता राज्यातून एकुण 109 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांत रायगड जिल्ह्यातील तीन शिक्षकांचा समावेश आहे. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराकरिता निवड झालेल्या रायगड जिल्ह्यातील तीन शिक्षकांमध्ये माध्यमिक शिक्षक विभागात रायगड मधील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहाय्यक शिक्षक श्रीमती रंजना दिलीप देशमुख, प्राथमिक शिक्षक विभागात कर्जत तालुक्यांतीलच पोशिर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिरचे सहाय्यक शिक्षक सचिन परशराम शिंदे आणि पोलादपूर तालुक्यांतील गोळेगणी येथील जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक शिक्षक सचिन परशुराम दरेकर यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT