रोहे : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ३० अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष व पुणे दानापूर सुपौल एक्स्प्रेस बदललेल्या गाडी क्रमांकांसह धावणार आहे.
रेल्वेच्या विशेष गाडयांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (६ सेवा) गाडी क्रमांक ०११४५ साप्ताहिक विशेष गाडी सोमवार ६ ऑक्टोबर २०२५, १३ ऑक्टोबर २०२५ व २० ऑक्टोबर २०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८.२० वा. सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी २२.४० वाजता पोहोचेल. (३ सेवा), गाडी क्रमांक ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी रविवार ५ ऑक्टोबर २०२५, १२ ऑक्टोबर २०२५ व १९
ऑक्टोबर २०२५ रोजी मडगाव येथून १६.३० वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ६.२० वाजता पोहोचेल. (३ सेवा) या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, वीलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी आणि करमळी हे थांबे देण्यात आले आहेत.
पनवेल चिपळूण पनवेल अनारक्षित विशेष (२४ सेवा) गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष गाडी ३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी पनवेल येथून १६.४० वा. सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.५५ वा. पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० अनारक्षित विशेष गाडी ३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवारी चिपळूण येथून ११.०५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १६.१० वा. पोहोचेल.
या गाडीला सोमाटणे, आपटा, जीते, पेन, कसु, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कलांबणी बु.दु., खेर्डी आणि अंजनी हे थांबे देण्यात आले आहेत. रेल्वेने वाशांना विनंती आहे की, वरील गाड्या अनारक्षित असतील आणि त्यासाठी तिकिटे यूटीएस प्रणा-लीद्वारे बुक करता येतील, ज्या तिकिटांसाठी सामान्य सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसारखे शुल्क लागू होईल. विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. आणि प्रवासाचा लाभ घ्यावा. असे मध्य रेल्वे कडून आवाहन करण्यात आले आहे.