रायगड : रायगड जिल्ह्यामध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यात महावितरण पेण मंडळात सोलर रूफटॉपअंतर्गत आतापर्यंत फक्त 2 हजार 194 उच्चदाब व लघुदाब वीज ग्राहकांनी सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे.
विजेच्या वाढत्या बिलातून सुटका हवी असेल तर सोलर रूफटॉप हा उत्तम पर्याय आहे. या रूफटॉपमुळे वीजबिलाच्या कटकटीतून सुटका होत असून, शून्य बिल येऊन पैशांची बचतही होत आहे. पाच हजार वीज ग्राहक यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून ते सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपणही या सोलर ऊर्जेचा पर्याय निवडून ग्राहकांनी आपले बिल शून्य करा, असे आवाहन अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी केले आहे.
वीज ग्राहक ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून ते सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आपणही या सोलर ऊर्जेचा पर्याय निवडून ग्राहकांनी आपले बिल शून्य करा, असे आवाहन वीज कंपनीकडून करण्यात आले आहे.
घराच्या छतावर तीन किलोवॉट क्षमतेचा सौरउर्जा निर्मिती प्रकल्प (रूफ टॉप सोलार यंत्रणा) बसविण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’तून प्रत्येक कुटुंबाला अनुदान दिले जाणार आहे. या सौरउर्जा प्रकल्पातून निर्माण होणार्या मोफत विजेने घरे उजळणार आहे, तसेच वीजबिलही शून्य होणार आहे.
‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’त केंद्र सरकारकडून घराच्या छतावर सौरउर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याद्वारे घराच्या छतावर सौरउर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.
‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’तून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. 3 किलोवॉट क्षमतेचा प्लांट उभारण्यासाठी सुमारे 1.45 लाख रुपये खर्च येणार आहे. रायगड जिल्ह्यात पंतप्रधान सूर्यघर योजना राबवली जात आहे. आतापर्यंत 2 हजार 124 जणांनी आपल्या घरावर सोलर लावून घेतले आहे.