महाड ( रायगड ) : फेसबुक या सोशल मीडिया माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका विवाहित महिलेसोबत शारीरिक अत्याचार व दिल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकरंद सूर्यकांत चव्हाण वय ३८, मूळ रा. तेलंगे, तालुका महाड, जि रायगड, सध्या राहणार विक्रोळी, मुंबई असे या आरोपीचे नाव आहे. आर धमकी ोपीची आणि महिलेची फेसबुक माध्यमातून ओळख झाली होती. त्या ओळखीचा गैरफायदा घेत सदर आरोपीने महिलेच्या महाड तालुक्यात जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करून त्याचे मोबाईल चित्रीकरण व फोटो काढून ते व्हायरल करण्याची तसेच नवऱ्याला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने महिलेच्या गोरेगाव माणगाव जिल्हा रायगड येथील तसेच आरोपीच्या विक्रोळी मुंबई येथील निवासस्थानी जवळपास अडीच वर्ष वारंवार संबंध प्रस्थापित केले.