Shravan Somvar Special Pudhari
रायगड

Shravan Somvar Special: पारमाची वाडीतील समस्त शिवभक्तांचे तारणहार श्री सिद्धेश्वर

महाड-भोर रस्त्याच्या घाटमाथ्यावर सह्याद्रीच्या कुशीतील देवस्थान; श्रावणात फुलतो भक्तीचा मळा

पुढारी वृत्तसेवा

श्रीकृष्ण बाळ

महाड: मागील अनेक वर्षापासून महाड तालुक्याच्या श्रीशिव शंभूच्या नावाने तालुक्याच्या विविध भागात असलेल्या मंदिरामध्येच वरंध भागातील पारमाची या तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन श्री सिद्धेश्वर यांच्या नावाने मंदिराची केलेल स्थापना या भागातील शिवभक्तांना आपल्या अनेक अडीअडचणी दूर करण्यासाठी तारणहार म्हणून ठरल्याची प्रतिक्रिया परिसरातील शिवभक्त व्यक्त करीत आहेत.

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारपासून सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सिद्धेश्वर मंदिर श्री क्षेत्र पारमाची वाडी महाड येथे श्रावणातील प्रत्येक सोमवारी षोडोपचार पूजा व अभिषेक सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत केली जाते.

नंतर आरती व भजन असे दिवसभर भक्तिमय वातावरणामध्ये कार्यक्रम साजरे केले जातात. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या मनमोहक मंदिरामध्ये येऊन आपण व सर्व भाविकांनी अभिषेक व दर्शनाचा लाभ शेकडो भाविकांकडून घेतला जात आहे.

महाड भोर रस्त्यावर घाट माथ्यावर सहयाद्रीच्या कुशीत वसलेले पारमाची वाडी या गावामध्ये बऱ्याच वर्षांपासून एक छोटस जीर्ण अवस्थेत शिव मंदिर होत. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावयाचा ग्रामस्थांनी निश्चय केला. त्या नंतर सदरचे मंदिर पूर्ण करण्यासाठी ४ ते ५ वर्ष लागली. ग्रामस्थाची चिकाटी व शिव शंभो प्रति असलेली अपार श्रद्धा असल्यामुळे मंदिर २००९ साली पूर्ण झाले.

मंदिर पूर्ण झाल्यावर आजपर्यंत दररोज पूजा अर्चा दिवा बत्ती नित्य नेमाने चालू असते. गावामध्ये हनुमान मंदिर, संतोषी माता मंदिर व शिवाजी महाराज मंदिर आहे. पारमाची वाडी हे एकमेव आस गाव आहे की दर वर्षी हनुमान मंदिर अखंड हरीनाम सप्ताह, संतोषी माता मंदिर होम हवन व शिव मंदिर लघु रुद्र अभिषेक असे नित्य नेमाने कार्यक्रम होत असतात.

पारमाची गावासह परिसरातील अनेक वाड्यावर त्यांमधून भक्तगण या ठिकाणी वर्षभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. विशेष करून श्रावणात होणाऱ्या श्री शिवशंभो महादेवांचे रूप असणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी पहावयास मिळते.

मागील काही वर्षात या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होत असून मंदिर व्यवस्थापनाकडून येणाऱ्या भक्तांकरिता विविध प्रकारच्या सोयीसुविधा व प्रसाद व्यवस्था आपुलकीने केली जाते. परिसरातील नागरिकांच्या असलेल्या श्री सिद्धेश्वरावरील निष्ठा आपला भविष्यकाळ सुरक्षित राहील असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

अखंड हरिनाम सप्ताह

ग्रामस्थाची चिकाटी व शिव शंभो प्रति असलेली अपार श्रद्धा असल्यामुळे मंदिर २००९ साली पूर्ण झाले. मंदिर पूर्ण झाल्यावर आज पर्यंत दररोज पूजा अर्चा दिवा बत्ती नित्य नेमाने चालू असते. गावा मध्ये हनुमान मंदिर, संतोषी माता मंदिर व शिवाजी महाराज मंदिर आहे. पारमाची वाडी हे एकमेव आस गाव आहे की दर वर्षी हनुमान मंदिर अखंड हरीनाम सप्ताह, संतोषी माता मंदिर होम हवन, व शिव मंदिर लघु रुद्र अभिषेक असे नित्य नेमाने कार्यक्रम होत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT