श्रीवर्धन शहर (रायगड) : आनंद जोशी
श्रीवर्धन शहर मुळांतच नारळी पोफळीच्या बागांनी नटलेले निसर्ग सुंदर शहर आहे. त्यात अधिकच भर घालणारे सौर ऊर्जेवर चालणारे १५० पथदिवे व १० हायमास्ट दिवे श्रीवर्धनच्या मुख्य रस्त्यांवर बसविण्यात आले असून ते ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष प्रकाशमान होणार असल्याची माहिती श्रीवर्धन नगर परिषदेकडून देण्यात आली.
सौर पथ दिव्यांबाबत न.प.कडून उपलब्ध माहितीनुसार ही योजना भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., दिल्ली कडून प्राप्त झाली असून कार्यान्वित केली जात आहे. या प्रकल्पाची तांत्रिक वैशिष्ट्ये म्हणजे या प्रकल्पात वापरण्यात आलेले ६ मीटर उंचीचे पोल हे मजबूत स्टीलपासून तयार केले असून समुद्री हवामानाला अनुकूल गॅल्वनाईज व खास कोटिंगसह संरक्षित आहेत. ॲल्युमिनिअम सजावट, इनबिल्ट जंक्शन बॉक्स आणि ३६० अंश फिरवता येणारी बॅकेट यामुळे हे पोल सौंदर्य व सुविधा दोन्हीही देतात.
या संपूर्ण योजनेला ऊर्जा मिळणार आहे सौर ऊर्जेच्या सहाय्याने. राबविण्यात येणारा सोलर फार्म विजेचा खर्च कमी करेल आणि नगर परिषदेसाठी दीर्घकालीन बचत निर्माण करील. हे विजेचे खांब श्रीवर्धन शहराची मुख्य स्वागत कमान ते समुद्र किनारा मुख्य रस्ता आणि प्रभु आळी रोड ते समुद्र किनारा या रस्त्यांवर बसविण्यात आले असून ते श्रीवर्धनच्या सौंदर्यात भर घालणार आहेत.
सर्व सौर दिवे 72 वॅट क्षमतेचे
याच्या प्रकाश व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे डेकोरेटिव्ह एल.ई.डी. दिवे हे हवामान व धक्कयांपासून संरक्षित आहेत. व खझ ६६ व खघ ९ रेटिंगसह, आकर्षक डिझाईन आणि टाईप २ लेन्स द्वारे प्रभावी प्रकाश वितरण करतात. हे पथदिवे७२ वॅट क्षमतेचे आहेत. आवश्यक सर्ज प्रोटेक्शन व उच्च दर्जाचे घटक यामध्ये वापरण्यात आलेले आहेत.