श्रीवर्धन तालुक्यातील आंबा बागायतदारांनी गेल्या सहा ते सात वर्षांत काजू उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे.  FILE
रायगड

Cashew Cultivation | श्रीवर्धन तालुक्यात आंबा उत्पादक वळतायत काजू पिकाकडे

काजू उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार्‍या बागायतदारांची वाढती संख्या

पुढारी वृत्तसेवा
श्रीवर्धन : भारत चोगले

Shrivardhan agriculture | श्रीवर्धन तालुक्यातील आंबा बागायतदारांनी गेल्या सहा ते सात वर्षांत काजू उत्पादनावर लक्ष केंद्रित करत विविध प्रयोग केले आहेत. तालुक्यातील योग्य हवामान आणि मातीच्या गुणवत्तेमुळे काजूची लागवड वाढविण्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार झाला आहे. वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात या काजू जातींच्या मोठ्या प्रमाणात लागवडीमुळे काजू उत्पादनात वाढ झाली आहे.

श्रीवर्धन तालुक्यात आंबा लागवडीचे एकूण क्षेत्रफळ 2870 हेक्टरी आहे, तर काजू लागवडीचे क्षेत्रफळ 645 हेक्टरी इतके आहे. आंबा आणि काजू हे दोन्ही वर्षावर्गीय पिके असले तरी, काजूचे उत्पादन दरवर्षी होत असल्याने आंबा उत्पादकांची काजूच्या उत्पादनाकडे वळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. विशेषतः, वेंगुर्ला सात आणि वेंगुर्ला चार या दोन जातींना बाजारात अधिक मागणी आहे, कारण वेंगुर्ला सात जातीत काजू मोठ्या आकाराचे येतात, ज्यामुळे त्याला अधिक आर्थिक लाभ होतो.

काजू लागवडीसाठी शासनाने ’फळबाग लागवड योजना’ व ’प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना’ अंतर्गत अनुदान प्रदान केले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बागायतदारांनी या योजनांचा लाभ घेऊन काजू उत्पादनाला गती दिली आहे. तसेच, काजू उत्पादनासोबतच स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे काजू फळांवर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सुरू झाले आहेत.

श्रीवर्धन तालुक्यात काजू लागवडीला प्रोत्साहन मिळाल्याने, बागायतदारांना अधिक आर्थिक फायदे होत आहेत आणि काजू उद्योगाला नवा आकार मिळत आहे.
- श्रद्धा किरण डुंबरे, तालुका कृषी अधिकारी,श्रीवर्धन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT