इलियास ढोकले
नाते: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांचा अभूतपूर्व महासागर उसळला आहे. किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी राजे,युवराज कुमार शहाजी राजे, रोहित पवार, अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवर शिवभक्त उपस्थित होते.
देशाच्या कानाकोपऱ्यातून,दऱ्याखोऱ्यांतून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. गडावर एकच धून 6 जून 6 जून सह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने गडावरचे वातावरण शिवमय झाले आहे.
अंगावर रोमांच उभ्या करणाऱ्या या अथांग गर्दीमुळे रायगडावरील प्रत्येक कडा भगव्या रंगात न्हाऊन निघाला आहे.'जय भवानी,जय शिवाजी'च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून शिवभक्तांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. शिवभक्तांच्या जनसागराचा लोट 4 जून पासून सुरू झाला असून 5 च्या रात्री गडाच्या पायरी वाटेवर गर्दी पहावयास मिळाली.
किल्ले रायगडावर 6 जून 2026 रोजी 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा झाला. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लाखोंच्या संख्येने शिवभक्त याच्या सुरक्षेसाठी गडावर व पाचाड सह पार्कींग व्यवस्थे ठिकाणी कडेकोट पोलोस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
जवळपास 1198 पोलीस कर्मचारी, 150 पोलीस अधिकारी, 3 आरसीपी, एक एसआरपी टीम,ड्रोन कंट्रोल टीम यासह अन्य अधिकारी वर्ग शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तैनात असणार आहेत.