रोहे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी दौरा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी (दि.२०) आयोजित केला होता. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार धैर्यशील पाटील होते.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथे दुपारी ३.२० सुमारास भेट दिली. आंबेवाडी नाका येथील उड्डाणपूलचे काम सुरू आहे. या कामाची त्यांनी पाहणी केली. खर्च वाढला तरी आंबेवाडी नाक्यावरील काम करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी माजी आ.अनिकेत तटकरे यांनी उद्भवणारा समस्या सांगितल्या. यावेळी उड्डाणपूल, सर्विस रोड, गटारे, पावसाळ्यात तुंबणारे पाणी आदी विषयात चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच सुरेश महाबळे, श्रीकांत चव्हाण, यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.