भक्तांच्या हाकेला धावणारी, पारमाची वाडीची-संतोषी माता pudhari photo
रायगड

Santoshi Mata Paramachi Wadi : भक्तांच्या हाकेला धावणारी, पारमाची वाडीची-संतोषी माता

सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

पुढारी वृत्तसेवा

महाड ः श्रीकृष्ण बाळ

महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत, देवींची वेगवेगळी रूपे आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळी नावे आहेत, आंबे माता, दुर्गा माता, रेणुका माता, भवानी माता, संतोषी माता, एकविरा आई, रंगू माता, वरदायनी माता, चंडिका माता, अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात.

महाड, पोलादपूर तालुक्यातील असे संतोषी मातेचे मंदिर म्हटलं की एकमेव असे आपोआप पारमाची वाडी चे नाव तोंडात येते, हो असंच आहे, सह्याद्रीच्या कुशीमध्ये कडी कपारी च्या रांगेमध्ये वसलेलं असं हे गाव आहे.

सण 1997 साली स्वर्गीय कैलासवासी नथुराम दादा मालुसरे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले, नथुराम दादा हे संतोषी मातेचे निश्चिम भक्त, मुंबई मुलुंड चेक नाका येथे, देवीचे मंदिर आहे, तेथे ते मंदिरात दर शुक्रवारी न चुकता जायचे, एक दिवस देवीची पूजा करून मनोभावे देवीला बोलले की जर माझी परिस्थिती झाली तर मी तुझी माझ्या गावांमध्ये स्थापना करेल, 1997 साली मंदिर सहा महिन्यांमध्ये बांधून पूर्ण केले, वैशाख शुद्ध पंचमीला मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

गणपती बाप्पा, श्री संतोषी माता व साईबाबा अशा तीन मूर्ती जयपूरहून मागविण्यात आल्या, तिन्ही मूर्ती संगमरवरी दगडामध्ये अतिशय सुंदर अशा बनविलेल्या आहेत, संतोषी मातेची मूर्ती अडीच फुटाची आहे, पूर्ण मंदिर मार्बल मध्ये बनवले आहे.

गेले 28 वर्ष मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या वतीने घटस्थापना करण्यात येते. दररोज दुपारी ग्रामस्थ महिलांचे भजन, संध्याकाळी आरती आणि रात्री गरबा नृत्य असे नियमित कार्यक्रम चालू असतात, ह्या दहा दिवसांमध्ये पूर्ण पंचक्रोशीतून महिला देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात, महिला आपला नवस देवीजवळ बोलत असतात, देवी त्यांची मनोकामना पूर्ण करते, त्यामुळे नवसाला पावणारे देवी असा देवीच नाव लौकिक आहे, दरवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला देवीच्या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.

ह्या दिवशी होम, हवन, यज्ञ, देवीचा अभिषेक, भजन, हरिपाठ, प्रवचन, आणि कीर्तन असा मोठा नियोजित कार्यक्रम करण्यात येतो, या कार्यक्रमाला महाड पोलादपूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणामध्ये भावीक उपस्थित राहतात, आणि देवीचा आशीर्वाद घेतात, मंदिराच्या बाजूला एकमेव असे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे व हनुमंताचे मंदिर आहे, ही सर्व धार्मिक कार्य पार पाडण्यासाठी ग्रामस्थ एक जुटीने उभे राहतात, मंदिराचा परिसर विलोभनीय असून या ठिकाणी गावातून बाहेर गेलेले तसेच महाड तालुक्यातील देवीचे भक्त या नवरात्र उत्सवामध्ये आवर्जून दर्शनार्थ येतात ..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT