शिवकालीन मूर्ती सापडताच श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकर्‍यांना मिळाल्याने त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. Pudhari
रायगड

Sankshi Fort | श्री सांकशी गडावर सापडल्या तीन दुर्मीळ शिवकालीन मूर्ती

धारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्याच्या सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. या शिवकालीन मूर्ती सापडताच श्री शिव प्रतिष्ठान हिंदूस्थानच्या धारकर्यांना मिळाल्याने त्यांचा आनंद आणि उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. हे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करीत असतात.

शिवछत्रपतींनी गडकोटांचा वारसा आपल्याला दिलाय तो जपण्यासाठी हे आचरण करुन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर गड संवर्धन मोहिमा होत आहेत. या मोहिमेच्या कार्याची पोचपावती म्हणून यंदा कार्य करताना 3 पुरातन मूर्ती धारकर्यांना सापडल्या. या गड संवर्धन मोहिमेत पेण, पनवेलसह आजूबाजूच्या परिसरातून देखील अनेक धारकरी, सेवेकरी गड संवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील 47 वी मोहीम राबवत असताना गडावरील पाण्याचे टाके साफ करताना पाण्याच्या टाक्यात श्री महादेवाची पिंड, भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्य बाण घेतलेली गड देवतेची मूर्ती, अशा 3 पुरातन मूर्ती टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांना सापडल्या. आजपर्यंत गडावर 46 संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत. त्यामधे गडावरील दगड, माती, गाळ याने भरलेल्या अनेक पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात धारकरी बंधूंना यश मिळाले आहे. परंतु आजची मोहीम ही झालेल्या सर्व गड संवर्धन मोहिमांचा आनंद द्विगुणित करणारी आणि सर्वांना शिवकाळात घेवून जाणारी मोहीम ठरली. यापूर्वी श्री सांकशी गडावर कोणत्याही देव-देवतेची मूर्ती नसताना धारकरी गडावर गड संवर्धन कार्य चालू करण्यापूर्वी गड देवतेचे स्मरण करुन गडाला श्रीफळ, पुष्पहार वाहून पूजा करत होते आणि प्रत्येक जण गडाच्या गड देवतेला साकडं घालत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT