इलियास ढोकले
नाते: किल्ले रायगडावरील कामासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत या कामांमध्ये कोणतीही हयगय व चुकारपणा आपण मान्य करणार नसून संबंधित शासकीय यंत्रणांनी अधिक दक्षपणे ठेकेदारांकडून सुरुवात केलेल्या कामांवर संबंधित कामे शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याबद्दल लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचा स्पष्ट इशारा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. नुकताच किल्ले रायगडाचा आपला पाहणी दौरा केला.यावेळी ते बोलत होते.
दोन दिवसापूर्वीच महाड येथे आले असताना त्यांनी किल्ले रायगडावरील कामासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्याचे संकेत दिले होते. त्यांनी अ भेटीदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन संबंधित ठेकेदारांची व शासकीय यंत्रणाची यासंदर्भात सविस्तर चर्चा केली तसेच योग्य ती समजही दिली.
गडावरील सध्याचा पाणीसाठा, गडावर येऊ घातलेले कार्यक्रम व गडावर सुरू असलेली कामे यात नियोजनबद्ध पाणी वापरण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या. तसेच जी कामे हाती घेण्यात आली आहे तेथे कोणतीही दिरंगाई, त्याची गुणवत्ता व त्याची शास्त्रोक्त पद्धती यात जर कोणत्याही सूचनांचे पालन होत नसेल तर ते खपवून घेतले जाणार नाही अशा स्पष्ट सूचना संबंधित कंत्राटदार यांना देण्यात आल्या.सध्या या परिसरातील अनेक कामे दृष्टीक्षेपात येतअसल्याने शिवभक्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गडावर सुरू केलेली कामे
प्राधिकरणामार्फत हाती घेतलेल्या बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या दरम्यान असलेल्या ऐतिहासिक फुटका तलाव एक, फुटका तलाव दोन, फुटका तलाव तीन, 12 टाके जवळील दारूगोळा कोठार, श्रीगोंदा तलाव, सूर्य घटिका जवळील जोते, महादरवाजा तटबंदी, खूबलढा बुरुज, नाणे दरवाजा जतन संवर्धन कामाची पाहणी केली. प्राधिकरणामार्फत नव्याने सुरू असलेल्या स्वच्छतागृहे, पदपथ, पाणीपुरवठा टाके, पायरी मार्गातील अपूर्ण कामे इत्यादी कामांची संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी व संबंधित कामावरचे कंत्राटदार यांच्या समवेत करण्यात आली.