Roha Helmet Drive Pudhari
रायगड

Roha Helmet Drive: रायगडमध्ये वर्षभरात हेल्मेटअभावी ८४ जणांचा मृत्यू; हेल्मेट सक्तीची मोहीम तीव्र

राेह्यात रस्ता सुरक्षिततेसाठी पोलिसांचे अभियान

पुढारी वृत्तसेवा

नितीश सकपाळ

रोहा: रोहा शहर व परिसरात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, हेल्मेट सक्ती मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन रोहा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात दुचाकीचे अपघातांचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षभरात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तब्बल ८४ दुचाकीस्वरांना विनहेल्मेट प्रवास करताना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

जिल्ह्यात दुचाकीचे अपघातांचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षभरात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तब्बल 84 दुचाकीस्वरांना विनहेल्मेट प्रवास करताना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हेल्मेट सक्तीची मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. तुमचे कुटुंब घरी तुमची वाट पाहत आहे, ही भावना लक्षात ठेवून केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी नव्हे, तर स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट घालणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर रोहा शहर परिसरातील धाव औद्योगिक वसाहती मधील सर्व कारखाना प्रशासन, सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि विविध संघटनांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

दुचाकी चालवताना 'आयएसआय' मानांकित हेल्मेटचाच वापर करा. सुरक्षित प्रवास करा आणि जबाबदार नागरिक बना, विना हेल्मेट फिरणे ही शिक्षा नसून जीवनाची सुरक्षा आहे.

विनाहेल्मेटमध्ये युवकांचे प्रमाण अधिक

रायगड जिल्ह्यात दुचाकीचे अपघातांचे प्रमाण वाढले असून, गेल्या वर्षभरात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये तब्बल ८४ दुचाकीस्वरांना विनहेल्मेट प्रवास करताना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये युवकांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT