रोहा नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी‌‘काटे की टक्कर‌’ 
रायगड

Raigad News : रोहा नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी‌‘काटे की टक्कर‌’

ठाकरे शिवसेनेला गड राखण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

रोहे : रोहा अष्टमी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरुवात झाली आहे. रोहा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने राष्ट्रवादीची ताकद आहे. परंतु गेली कित्येक वर्ष अष्टमीमध्ये शिवसेनेने ( उबाठा ) आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे दिसून येते. रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या या प्रभाग क्रमांक 1 मध्ये या निवडणुकीत शिवसेना आपले वर्चस्व कायम ठेवणार का हे पाहावे लागणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक या प्रभागात उमेदवार असल्याने ही लढत चुरशीची होणार असे बोलले जात आहे. या प्रभागात अष्टमी कासर आळी, मराठा आळी, आंबेडकर नगर या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात पुरुष मतदार 984, स्त्री मतदार 1032 असे एकूण 2016 मतदार आहेत.

या मतदारसंघात मागील निवडणुकीत झालेल्या समीक्षा बामणे, नेहा पिंपळे या निवडून गेल्या होत्या. यावेळी प्रभाग क्रमांक 1 अ या जागेसाठी शिवसेना ( शिंदे गट ) कडुन श्रीमती पुजा नितेश ऐनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन हजारे नीता महेश, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडुन जाधव मीना देवीदास या निवडणूक लढवत आहेत तर प्रभाग क्रमांक 1 ब अपक्ष म्हणुन मधून म्हैसकर अब्दुल रज्जाक मुश्ताक, शिवसेना ( शिंदे गट ) कडुन बोथरे महेश मोहन,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडुन साळवी विकास मारुती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कडु प्रशांत बंडु, शिवसेना ( उबाठा ) कडुन लांजेकर मनोज हरीश्चंद्र हे निवडणूक लढवीत आहेत.

ही निवडणूक राष्ट्रवादी पक्षांनी प्रतिष्ठेची बनवले असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी आपली ताकद दाखवणार असल्याचे बोलले जात आहे सध्या तरी प्रभाग क्रमांक 1 आ मधुन निता हजारे व ब मधुन लांजेकर मनोज हरीश्चंद्र यांना अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT