खांब ः श्याम लोखंडे
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे गावचे आराध्य ग्रामदैवत श्री धाक्सुद महाराजांचा नवरात्रोत्सवाला सोमवारी 22 सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून ग्रामस्थांचे श्रद्धास्थान धाक्सुद महाराज घटी बैसल्याने येथे मोठ्या उत्साहाने व आनंदाने येथील ग्रामस्थ,महिला,व युवक युवती एकत्रितपणे दररोज विविध पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उपक्रम राबवत हा नवरात्रो उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील धार्मिक तथा आध्यात्मिक तसेच वारकरीपरंपरेचा वारसा लाभलेल्या खांब पंचक्रोशीतील मौजे चिल्हे येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत व श्रद्धास्थान असलेले धाक्सुद महाराज यांच्या उजव्या बाजूला स्वयंभू देवस्थान, डाव्या बाजूला भैरव ,आई चिल्लाई माता,आई जोगीश्वरी माता,बजरंगबळी हनुमंतराया,त्याच बरोबर विठ्ठल रुक्मिणी ,श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज,तर समोर गिरोबा आणि पुन्हा मोठे हनुमंतराया तर पूर्वेकडून पश्चिमेकडे असणार्या पर्वताच्या रांगा बाजूने कुंडलिकेच्या सिंचनातून बारमाही वाहत असलेला कळवा तसेच मंदिराच्या व गावच्या पूर्वेला कळभैरी माता पाच्शिमेस काळकाई दक्षिणेस श्री शंभू महादेव आणि भले मोठे तलाव आणि बारमाही वाहणारी कुंडलिका नदी उत्तरेस बापूजी बुवा आणि पर्वताची रांग असा या मंदिरातील देवस्थान मूर्तींची साक्ष देत आहेत. गावच्या भक्तांच्या हाकेला धावून येणारे ग्रामस्थांचे जागृत आराध्यदैवत धाक्सुद महाराज त्यामुळे नवरात्रोत्सव काळात या ठिकाणी माहेरवाशीण देखील आपल्या कुटूंबसमावेत दर्शनासाठी येत मंत्र मुग्ध आनंद घेतात.
तसेच रोहा चे आराध्य दैवता धावीर महाराज प्रमाणेच प्राचीन काळापासून येथील ग्रामस्थ या मंदिराची पावित्र्य जतन करत या देवाची पूजा करतात परंपरेने चालत आलेली परंपरा आजही येथील ग्रामस्थांनी व त्यांच्या पावलावर पाऊल टाकत युवा पिढीने जपली आहे. नवरात्रीच्या काळात ग्रामदैवत धाक्सुद महाराजांच्या समावेत मंदिरातील येथील सर्व देवांच्या मूर्तींना वस्त्र पोशाख चांदीचे मुखवटे दागदागिने यांचा साज चढवत देव घटी बसवतात तर या कालावधीतील दहा ते अकार दिवस हा उत्सव धावीर महाराज देवस्थान प्रमाणेच येथे साजरा केला जातो.
विशेषतः म्हणजे धाक्सुद महाराज देव घटी बसताच सोलापूरहुन ज्यांची वंशज परंपरा चालत आलेले गोंधली आपले परंपरागत संमेलन वाद्य घेऊन पहिल्याच दिवशी हजर होत या देवाची सकाळ संध्याकाळ आरती गात संबेलन वाद्य वाजवत चांगभलं व जय घोष करतात. त्याच बरोबर ग्रामस्थ पहाटेचा काकडा आरती पूजा,सायंकाळी हरिपाठ हरीभजन आशा धार्मिक आणि आध्यत्मिक विविध पद्धतीने व तसेच युवक युवती विविध कार्यक्रम व दांडिया गरबा खेळत याचा आनंद लुटतात.
ग्रामस्थांच्या हाकेला धावणारे व भक्तांच्या नवसाला पावणारे धाक्सुद महाराज देवस्थान हे रोहा तालुक्यातील मुबंई गोवा महामार्गालगत जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड मार्ग या मार्गावर व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले सूंदर आणि स्वछ निर्मळ हे चिल्हे गावात आणि या ठिकाणी वसलेले धाक्सुद महाराज सतं महत्म्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या खांब पंचक्रोशीतील हे गाव धार्मिक आणि आध्यात्मिक वारकरीपरंपरेचा वारसा परंपरा लाभलेले चिल्हे गावात विविध उपक्रम राबविले जातात नवरात्रीचे नऊ दिवस या ठिकाणी मोठा आनंद मिळतो त्याच बरोबर पहिल्या दिवसांपासून ते सांगता समारोह पर्यंत येथील ग्रामस्थ एकत्रितपणे येऊन हा उत्सव मनोभावे भक्तिमय वातावरणात साजरा करतात.
या देवस्थानाचे नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी नवमीला या देवांची रात्रौ बारा वाजता आजही चार ते पाच गाव परिसरातील तलावामधील फुललेली कामलांची फुले आणून महापूजा केली जाते दहाव्या दिवशी या देवाचा वर्धापनदिन म्हणून दिवसभर धार्मिक आध्यात्मिक तसेच रात्री युवक युवती गरबा फॅन्सी ड्रेस, सामजिक शैक्षणीकविषयांवर मौलिक मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम साजरा करतात तर दुसर्या दिवशी परंपरेने चालत आलेला धावीर महाराज यांच्या पालखी प्रमाणेच या गावात धाक्सुद महाराज यांची देखील पालखी परंपरा असल्याने येथील ग्रामस्थ महिला युवक युवती विविध वेशभूषा करत गावात घरोघरी पालखीचे आगमन करत दर्शन देत पालखी पुन्हा मंदिरात जाऊन हा सोहळा आनंदाने व उत्सवाने साजरा करत याची सांगता शेवटी महाप्रसादाने करतात.