खांब ः श्याम लोखंडे
रोहा तालुक्यात औद्योगीक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या धाटाव एम आय डी सी हद्दीतील रासायनिक कारखान्यांनमधून हवेत सोडण्यात येणार्या केमिकल मिश्रित वायू प्रदूषनामुळे या परिसरातील नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. येथील खरीप हंगामात लागवड केलेली भातशेती तसेच फळबागायतीसह पर्यावरण यांना धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात असून हवेत सोडण्यात येणार्या वायू प्रदूषण रोखण्यासाठी कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रोहा धाटाव एम आय डी सी हद्दीतील काही रासायनिक केमिकल कंपनीतून पावसाचा गैर फायदा घेत हवेत सोडण्यात येणार्या विषारी वायु रोहा कोलाड मार्गावरून जैनवाडी ते सुदर्शन स्टॉप दरम्यान नागरिकांच्या डोळ्यात जाऊन डोळे चूरचूर करीत आहेत तर वाहन चालवताना हा धूर वाहन चालकांच्या डोळ्यात गेला तर डोळे चोळण्याच्या नादात समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच शाळकरी विद्यार्थी वर्गाला तसेच नागरीकांना येथील मार्गक्रमण करताना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो असे चित्र सकाळी पहाटे आणि सायंकाळी या परिसरात तसेच या क्षेत्रात गेली चार पाच दिवसांपासून पाहवयास मिळत आहे.
सदरच्या कंपनीतून सोडण्यात येणार्या रासायनिक केमिकल सर्वीकडे लाल पिवळसर धुव्वा विषारी वायूमुळे डोळे, नाक, तोंडाच्या वाटे फुप्फुसाच्या मार्गाने खोलवर प्रवेश करतो व यामुळे श्वसन संक्रमण, हृदयविकार, फुप्फुसाचा कर्करोग या सारख्या आजाराने लोकांचे जिवन धोक्यात आले आहे. या न्युरोलॉजिकल परिस्थितीमुळे कमजोरी आणि स्मृतीभ्रंश होण्याचा धोका वाढला असल्याचे बोलले जात आहे. तर या सार्या प्रकारामुळे वरसे स्टॉप ते बारसोली किल्ला स्टॉप या दरम्यान वाहन चालकांना तसेच प्रवास करणार्या प्रवाशांना या धुव्याला सामोरे जावे लागते तर पावसात सर्वत्र पसरलेला प्रदूषण हा धाटाव, रोहा, वरसे, भुवनेश्वर, उडदवणे,बाहे, देवकान्हे, खांबसह कोलाड परीसरात त्याचे पडसाद उमटत असल्याची बोंब सर्वत्र व्यक्त होत आहे. तसेच त्यात पाऊस अधिक श्वास कोंडीत त्यामुळे प्रवास करताना देखील पादचारी तसेच वाहन चालकांची मोठी दमछाक होत असल्याचे समजते.
या हवेत सोडण्यात येणार्या प्रमुख प्रदूषकांमध्ये कण, कार्बन मोनो ऑक्साईड, ओझोन, नायट्रोजन डॉय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड यांच्या वायू प्रदूषणामुळे श्वसन व इतर आजार पसरत आहे. तसेच हवेतून सोडण्यात येणार्या विषारी प्रदूषणामुळे व धुरामुळे या परिसरातील थेट भातशेती तसेच काही ठिकाणच्या पाळे भाज्या आणि भेंडी, काकडी, कारली, पडवळ, शिराळा,घोसाळी, इतर भाजी यांना या प्रदूषणाची झळ पोहचत असून धोक्यात आली आहे. यामुळे विषारी धूर सोडणार्या कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने या विषयी सदरच्या कारखानदार यांच्याकडून यावर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
विषारी वायूमुळे डोळे, नाक, तोंडाच्या वाटे फुप्फुसाच्या मार्गाने खोलवर प्रवेश करतो व यामुळे श्वसन संक्रमण, हृदयविकार, फुप्फुस कर्करोग या सारख्या आजाराने लोकांचे जिवन धोक्यात येण्याची शक्याता आहे.