अलिबाग समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्रीसर्प pudhari photo
रायगड

Rare sea snake : अलिबाग समुद्रकिनारी दुर्मिळ समुद्रीसर्प

अत्यंत विषारी साप; प्राणीमित्रांनी सापाला सुरक्षित सोडले समुद्रात

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः अलिबाग समुद्र किनार्‍यावर नुकताच एक समुद्रीसर्प वाळूवर पडलेला आढळला. एका नागरिकाने या सर्पाबद्दल प्राणीमित्रांना माहिती दिल्यानंतर त्यास सुरक्षित रित्या समुद्रात सोडून देण्यात आले.

या समुद्री सर्पाची माहिती मिळताच वाइल्डलाइफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेचे सभासद अक्षय पाटील यांनी घटनेची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर आणि सदस्य अदिती सगर यांना दिली. त्यांनी सापाची प्राथमिक तपासणी करून तो आजारी अथवा जखमी नसल्याची खात्री करून सदर सापाला सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडून दिले.

हा साप पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प म्हणून ओळखला जातो. हे समुद्रसर्प दुर्मिळ असून क्वचितच अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी सापडतात. आजारपण, इजा अथवा थकव्यामुळे हे साप भरतीबरोबर समुद्रकिनार्‍यावर येतात. हे साप आपले संपूर्ण आयुष्य समुद्रात घालवतात. त्यामुळे या सापांची शरीररचना जमिनीवर सरपटण्यासाठी अनुकूल नसते आणि त्याचमुळे एकदा का हे वाळूवर अडकले की पुढच्या भरतीपर्यंत ते परत समुद्रात जाऊ शकत नाहीत आणि बरेचदा यादरम्यान त्यांचा मृत्यू होतो.

सर्वच समुद्रसर्प अत्यंत विषारी असून त्यांचा दंश झाल्यास प्रतिसर्पविष लस उपलब्ध नाही, त्यामुळे असे साप किनार्‍यावर आढळून आल्यास स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये आणि वनविभाग अथवा वाइल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटनेशी संपर्क साधावा, असे डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी नमूद केले.

हा साप पिवळ्या पोटाचा समुद्रसर्प म्हणून ओळखला जातो. हे समुद्रसर्प दुर्मिळ असून क्वचितच अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनारी सापडतात. सर्वच समुद्रसर्प अत्यंत विषारी असून त्यांचा दंश झाल्यास प्रतिसर्पविष लस उपलब्ध नाही, त्यामुळे असे साप किनार्‍यावर आढळून आल्यास स्वतः त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये आणि वनविभाग अथवा प्राणीमित्रांशी संपर्क साधावा.
डॉ. प्रसाद दाभोळकर, अध्यक्ष, वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संघटन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT