उरणमध्ये दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन Pudhari News Network
रायगड

Rare Birds Raigad : उरणमध्ये दुर्मीळ पक्ष्यांचे होतेय दर्शन

पाणथळी भागाचे जैवविविधतेतील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

उरण (रायगड): उरण तालुक्याच्या पाणथळी भागात नुकतेच दुर्मीळ समजले जाणारे Red-necked Phalarope (Phalaropus lobatus) लाल मानेचा फलारोप आणि Spotted redshanks (Tringa erythropus) ठिपक्यांचा टिलवा या पक्ष्यांचे फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरण रायगड संस्थेचे वन्यजीव अभ्यासक व पक्षनिरीक्षक निकेतन रमेश ठाकूर यांना 28 एप्रिल 2025 रोजी बेलपाडा येथील पाणथळींमध्ये दर्शन झाले.

उरण तालुक्याच्या पाणथळी भागाचे जैवविविधतेतील अनमोल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निकेतन ठाकूर आणि त्यांचे सहकारी हेमंत वारे आणि दिलीप कदम हे पक्षी उरण बेलपाडा व सावरखार येथे निरीक्षणास गेले असता त्यांना एक रेड नेक्ड फलारोप व सोळा स्पॉटेड रेडशँक दिसले. त्यांनी त्याची नोंद श-बर्ड ह्या जागतिक पक्षीनिरीक्षण नोंदीच्या संकेत स्थळावर केली आहे.

रेड-नेक्ड फॅलरोप आणि स्पॉटेड रेडशँक हे दोन्ही स्थलांतरित पक्षी असून, विशेषतः त्यांच्या परतीच्या स्थलांतर मार्गात त्यांचे दर्शन दुर्मिळ मानले जाते.

रेड-नेक्ड फॅलरोप आणि स्पॉटेड रेडशँक हे दोन्ही स्थलांतरित पक्षी असून, विशेषतः त्यांच्या परतीच्या स्थलांतर मार्गात त्यांचे दर्शन दुर्मिळ मानले जाते. अशी माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली. यामुळेच उरणच्या पाणथळीचे महत्त्व जागतिक पातळीवर वाढवून दाखवले जात आहे.

उरणच्या पाणथळीचे महत्त्व जागतिक पातळीवर वाढवून दाखवले जात आहे.

या भागातील दलदली, खारफुटी आणि उथळ जलक्षेत्रे स्थलांतरित व देशी पक्ष्यांसाठी अत्यंत आवश्यक अधिवास म्हणून ओळखली जातात. तसेच पावसाळ्यात व भरती -ओहोटी क्षेत्रातील पाणी निचरा होण्याकरिता हे धारण तलाव उपलब्ध असणे आवश्यक आहे तसेच त्या धारण तलावात स्थानिक मासेमार लोकांस मासळी पकडून त्यांचा उदरनिर्वाह करता येईल. व निसर्ग पर्यटनास जर चालना मिळाली तर स्थानिकांना योग्य रोजगार ही प्राप्त होईल.

उरणची पाणथळी जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असून, ती अनेक दुर्मिळ व संकटग्रस्त पक्ष्यांना आश्रय देत आहेत. अशा ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे मत फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. या दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदीमुळे उरणच्या पाणथळी क्षेत्राला अधिक संवेदनशील आणि संरक्षित घोषित करण्याच्या मागण्या पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT