Rain in the Raigad
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.  File Photo
रायगड

Rain Update|रायगड जिल्ह्यात 60 गावांचा संपर्क तुटला

पुढारी वृत्तसेवा

रायगड जिल्हात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासात एकूण १४९ मि.मी. पावसाची नोंद झाली. काही तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दरम्यान महाड तालुक्यातील लाडवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून ६० गावांचा जनसंपर्क तुटला आहे. वादळी पावसाने झाडांची पडझड, पुले पाण्याखाली गेल्याचे दृश्य असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यंदा मान्सूनची वाटचाल

हवामान विभागालाही हुलकावणी दिली आहे. हवामान विभागाने पावसाचे ऑरेंज अलर्ट दिला असता दिवसा प्रखर उन्ह होते. मात्र बुधवारपासून पुन्हा जोरदार पाऊ स बरसल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हयात बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंतच्या चोवीस तासात अलिबाग व सुधागड तालुक्यात ४ मि.मी., पेण आणि पनवेलमध्ये १, मुरुड ३, उरण १२, रोहा १०, तळा १९, महाड ८, पोलादपूर ३०, म्हसळा २४, श्रीवर्धन २७ तर कर्जत, खालापूर आणि माथेरान अडखळत सुरू राहिली. पावसाने येथे पावसाची नोंद नाही. एकूण १४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाची अधिक नोंद आहे. आगामी तीन दिवसात पावसामध्ये चढ उतर दिसणार आहे. हवामान विभागाने २७ जूनसाठी ऑरेंज अलर्ट, २८ जूनसाठी यलो, २९ जूनसाठी ग्रीन आणि ३० जूनसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. सध्या जिल्हयात पिण्याचे आणि शेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी राबांना तर काही ठिकाणी लावणीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस झाला आहे.

गेल्यावर्षी जिल्हात एकुण पाऊस फक्त 43 मिमि तर यावर्षी ३०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मुरुडमध्ये तर यावर्षी माणगाव तालुक्यात पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे.

महाड-म्हाप्रळ रस्ता गेला वाहून

खाडीपट्टा : महाड-म्हाप्रळ रस्त्याचे गेली चार वर्षे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या मार्गावरील तेलंगे येथील पुलाच्या कामामुळे पुलाच्या शेजारी तात्पुरत्या स्वरूपात पाईप टाकून करण्यात आलेला रस्ता बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने वाहून गेला. त्यामुळे तेलंगे गावापुढील नागरिकांचा महाड शहराशी संपर्क तुटला आहे. तेलंगे येथील पुलाच्या दुतर्फा अनेक वाहने अडकून पडली होती. ठेकेदाराच्या निष्क्रियतेमुळे नाहक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता वाहून गेल्यावर पुन्हा पाईप टाकूण तात्पुरता रस्ता बांधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु होते. तेलंगे येथील नदीला पाण्याचा प्रवाह मोठा असून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बांधलेला तात्पुरता रस्ता वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. ही माहिती लक्षात घेता संबधित ठेकेदारांकडून तात्काळ तात्पुरता रस्ता बांधण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरु होते. मात्र तोपर्यंत अनेक वाहनांनी टोळ मार्गे जाण्याचे पसंत केले. तर दुसरीकडे तेलंगे पुढील बेबलघर, चिंभावे, वराठी, गोमेंडी, म्हाप्रळ तसेच मंडणगड, वेळास, बाणकोटकडे आणि महाड दिशेला येणारी अनेक वाहने रस्त्यावर थांबलेली पाहायला मिळाली. तीन जिल्ह्यांना जोडणारा हा महामार्ग दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा असून मात्र संबंधित अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळत आहे. तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बांधण्यात आलेला रस्ताच वाहून गेल्यानंतर कित्येक वाहनांनी टोळमार्गे प्रवास करण्याचा विचार करून अखेर उलटा प्रवास सुरु केला.

SCROLL FOR NEXT