सुनील तटकरे file photo
रायगड

Raigad Zilla Parishad Politics: भाजपची आमची निवडणूकपूर्व यूती, आम्ही सत्ता स्थापन करु; खासदार सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

भाजपा-राष्ट्रवादी यूतीला बहुमताचा दावा; शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षामुळे रायगडच्या राजकारणात नवे समीकरण

पुढारी वृत्तसेवा

रायगड : भाजपा राष्ट्रवादी यूतीला बहूमत मिळालेले असून आम्ही जिल्हा परिषदेत सत्तास्थापन करु असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सूनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

आम्ही यूती केल्ल्या ठिकाणी 37 जागा निडून आलेल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेला आम्हीला कोणतीही अडचण नाही, असेही तटकरे म्हणाले. दरम्यान शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनीही भाजपा आमच्या सोबत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपा कोणत्या मित्रपक्षाला झुकतेमाप देणार याकडे रायगडवासीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी पाच पाच पंचायत समीत्या मिळाल्या आहेत. यामद्ये शिवसेनेला महाड, पोलादपूर, माणगाव, अलिबाग, मुरुड या पंचायत समीती बहुमत मिळाल्याने त्यांच्या पक्षाचे सभापती, उप सभापती बसणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन,कर्जतमध्ये बहूमत मिळाले आहे. त्याचा सभापती येथे बसणार आहे. तर भाजपाला पेण, पनवेल, खालापूर, सुधागड येथे भाजपाला सभापती बसवण्याची संधी आहे. तर महाविकास आघाडीला एकमेव उरण पंचायत समीता मिळाली आहे.

परिणामी रायगडच्या सत्ता समिकरणामध्ये शिवसेना राष्ट्रवादी असा पालकमंत्री पदावरुन सूरु झालेला संघर्ष, भविष्यात आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT