अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या 59 तसेच जिल्ह्यातील पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज छाननीनंतर अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया मंगळवारी(दि. 27) सकाळी अकरा त्ो तीन या वेळेत जिल्ह्यामध्ये झाली. जिल्ह्यातील 502 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यात जिल्हा परिषदेचे 173 व पंचायत समितीच्या 329 उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांची अंतिम लढत होणार आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यापुर्वी चार फेब्रुवारीपर्यंत प्रचाराची संधी मिळणार आहे. जाहीर सभांपेक्षा घरोधरी मतदारांच्या भेटीगाठीवरच उमेदवारांचा भर असल्याचे दिसत आहेत.
गावबैठकीनंतर आता प्रचाराच्या माध्यमात्ूान मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत शेकापने 23 जागांवर विजय मिळविला होता. या निवडणूकीत जास्तीत जास्त उमेदवार यावेत, यासाठी शेकाप मार्फत प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. शेकाप महाविकास आघाडीने या निवडणूकीत नवीन चेहऱ्यांना संधी देत असताना सुशिक्षीत उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आहे. निवडणूकीत उच्च शिक्षीत व सुसंस्कृत उमेदवार असावा, यासाठी हा प्रयत्न केला आहे. गाव बैठकांसह प्रचारांमुळे जिल्ह्यात शेकाप महाविकास आघाडीला अधिक यश येईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
प्रदिर्घ कालावधीनंतर रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला. 16 त्ो 21 या कालावधीत अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आली होती. अर्ज छाननीची प्रक्रीया 22 जानेवारीला झाली. यामध्ये जिल्ह्यातील एक हजार 72 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 386 आणि पंचायत समितीच्या 686 अर्जांचा समावेश होता. या छाननीनंतर माघार घेण्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होत्ो. अखेर तो दिवस उजाडला. मंगळवारी(दि. 27) माघार घेण्याची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 502 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या उमेदवारांची अंतिम लढत होणार आहे.