Election candidates File Photo
रायगड

Raigad Zilla Parishad Election: रायगड जिल्हा परिषद निवडणूक : जुन्या चेहऱ्यांची कसोटी, नव्यांसाठी संधी

५९ जागांसाठी रंगतदार लढत; १४ विद्यमान सदस्य पुन्हा रिंगणात, राजकीय समीकरणे बदलली

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी रंगतदार लढाई होणार आहे. गतवेळी 2017 साली झालेली निवडणूक लढवून विजयी झालेले 14 सदस्य यंदा पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

गतवेळी पती निवडून आलेल्या तीन जागांवर पत्नी, तर पत्नी निवडून आलेल्या सहा जागांवर पती यंदा निवडणूक लढवत आहेत. 2017 साली विजयी झालेल्या आठ सदस्यांनी मात्र यंदा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे पुन्हा मतदार या उमेदवारांना संधी देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

रायगड जिल्हा परिषदेची सार्वत्रिक 2026 निवडणूक जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मतदान आणि मतमोजणी तारीख बदलेली असून निवडणूक दोन दिवस पुढे गेली आहे. 7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दोन दिवस उमेदवारांना प्रचारासाठी अधिकचे मिळाले आहेत. जिल्ह्यात सोयीनुसार युती, आघाडी करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर झेंडा फडकविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

सन 2017 साली शेकापचे 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 12, भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी 3 असे 59 सदस्य निवडून आले होते. मात्र नऊ वर्षात राजकीय परिस्थिती बदललेली आहे. शेकापचे आलेले 23 सदस्य हे सध्या इतर पक्षांत गेल्याने शेकापला नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागली आहे. 2017 साली निवडून आलेले 14 सदस्य पुन्हा आपले नशीब यंदाच्या निवडणुकीत अजमावत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT