Unclaimed dead bodies | रायगडमध्ये गेल्या वर्षभरात आढळले 92 बेवारस मृतदेह file photo
रायगड

Unclaimed dead bodies | रायगडमध्ये गेल्या वर्षभरात आढळले 92 बेवारस मृतदेह

मृतदेहांच्या नातेवाइकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

रायगड : रायगड पोलीस क्षेत्राच्या हद्दीत गेल्या वर्षभरात 92 बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. आता पोलिसांसमोर बेवारस सापडणार्‍या मृतदेहांच्या नातेवाइकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान समोर उभे आहे.

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद पोलिस दफ्तरी होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत असताना, आता दुसरीकडे पोलिसांसमोर बेवारस सापडणार्‍या मृतदेहांच्या नातेवाइकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान समोर उभे आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे मैत्रीमध्ये तंटे होऊन एकमेकाचे खून केले जात आहेत. खून करून मृतदेह बेवारस टाकले जात आहेत. जिल्ह्यात बेवारस मृतदेहाची संख्या वाढत आहे.

बेवारस मृतदेह पोलिसांना मिळत आहेत. बेवारस मृतदेह मिळण्यामागची कारणे वेगवेगळी असतात.

पोलीस ठाणेनिहाय वर्षभरातील नोंदी

अलिबाग- 3, मांडवा सागरी- 1, कोलाड- 2, नागोठणे-2, पाली- 2, माणगाव- 7, गोरेगाव- 2, श्रीवर्धन- 3, महाड तालुका- 1, महाड शहर- 3, महाड एमआयडीसी - 2, पोलादपूर- 3, वडखळ- 7, पेण- 14, दादर सागरी- 1, रसायनी- 3, खालापूर- 12, खोपोली- 8, कर्जत- 10, नेरळ- 6.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT