रायगड; पुढारी वृत्तसेवा : पेण तालुक्यातील वडखळ येथील सावली लाॅजच्या व्यवस्थापकाचा एका अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्राने गळा आणि गुप्तांग कापून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. ६) रात्री घडली. यातील तीन आरोपींना रायगड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परराज्यात पळून जात असताना अटक केली.
सदर गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के आणि पथकासह घटनास्थळी भेट दिली. यातील आरोपी लॉज व्यवस्थापकाचा खून करुन पसार झाले होते. चंद्रजीत झंकूराम भारद्वाज (वय-30) वर्षे रा.नवली ता.शाहगंज , जि.जोनपूर राज्य-उत्तरप्रदेश), हरीशंकर लालचंद राजभर (वय-19 वर्षे रा.सवायन ता.शहागंज ,जि.उत्तर प्रदेश), अंजुदेवी सरोज चौहान (वय-32 वर्षे रा.खलारी ता.खलारी, जि.रांची राज्य-झारखंड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलीस तपासा दरम्यान आरोपींची नावे मिळाली. आरोपींच्या मोबाईल नंबरचे लोकेशन प्राप्त केले असता त्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोपींचा शोध घेऊन गोपनीय माहिती प्राप्त करण्यात आली. यावेळी आरोपी खासगी वाहनाने वडखळ येथून पेणकडे पळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे इतर 03 अधिकारी सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे ,पोलीस उपनिरीक्षक चौहान यांना पथकासह सदर ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर पेण व पनवेलकडे जाणा-या महामार्गावर वाहनांची तपासणी चालू करण्यात आली. दरम्यान आरोपी पेण येथे वाहन बदलून एसटी बसने पनवेलकडे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सदर बसचा पाठलाग करून बस आडवून सदर बसमध्ये आरोपींचा तपास घेतला असता, गुन्ह्यातील 03 आरोपी बसमध्ये आढळून आले. तिनही आरोपींना ताब्यात घेवून सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबुल केला. तीनही आरोपींनी उत्तरप्रदेश व झारखंड येथे पळून जात असल्याची माहिती दिली.
चौकशी मध्ये निष्पन्न झाले कि, सदर गुन्ह्यातील नमूद महिला आरोपी बरोबर आरोपी नं.01 याचे प्रेमसंबंध होते तसेच सदर महिला आरोपिताचे मयताबरोबर देखील अनैतिक संबंध होते. त्याबाबत मयत व वर नमूद आरोपी नं.01 यांच्यामध्ये एक आठवड्यापूर्वी भांडण झाले होते त्यावेळीच आरोपी नं.01 याने मयताला जीवे ठार मारण्याचा निच्छय केला. त्यासाठी त्याने चाकू खरेदी केला. मयताला जीवेठार मारण्याकरिता महिला आरोपी प्रथम मयत इसमाकडे सावली लॉजवर गेली तिने मयताबरोबर शारीरिक संबंध करणेकामी रूम नं.115 मध्ये घेऊन गेली त्याच वेळी प्लॅन केल्याप्रमाणे आरोपी नं.01 व 02 सदर रूममध्ये गेले व रूमचा दरवाजा आतून बंद करून तिघांनी संगनमत करून मयताचे तोंड दाबून खाली पाडून त्याचे छातीवर बसून चाकूने गळा कापण्यात आला त्यानंतर त्याचे लिंग कापण्यात आले.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे ,पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के, पोह अमोल हंबीर, पोह प्रतिक सावंत, पोना सचिन वावेकर ,पोशि ईश्वर लांबोटे, तसेच सायबर पोलिस ठाणेतील, पोना तुषार घरत, पोना, अक्षय पाटील या गून्हयाचे तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.