पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये श्रीवर्धन नगरपरिषदने केलेली उत्कृष्ट कामगिरी केली आहे. Pudhari News Network
रायगड

रायगड : श्रीवर्धन नगर परिषद कोकणात प्रथम

‘माझी वसुंधरा अभियान’मध्ये केली उत्कृष्ट कामगिरी; 75 लाखांचे बक्षीस

पुढारी वृत्तसेवा

श्रीवर्धन : श्रीवर्धन नगरपरिषदेसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. पर्यावरण व वातावरण बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये श्रीवर्धन नगरपरिषदने केलेली उत्कृष्ट कामगिरी केवळ प्रशंसा व रूपाने नव्हे, तर बक्षीस स्वरूपातही प्रकटली आहे.

कोकणातील पहिला ठसा घेत, श्रीवर्धनने शासनाकडून 75 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे! याचा विशेष मान खासदार सुनिल तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कामकाजामुळे मिळाला आहे.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे यांच्या योगदानामुळे, श्रीवर्धन शहराच्या विकासासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मिळालेल्या सूचनांचा प्रभाव विशेषत: माझी वसुंधरा अभियानात दिसून आला. त्यांचा नेत्यृत्त्व आणि मार्गदर्शन, नगरपरिषदेच्या विविध प्रयत्नांना अधिक दिशा आणि सामर्थ्य देत आहे.

श्रीवर्धन नगरपरिषदेसाठी माझी वसुंधरा 5.0 अभियानासाठी तयारी सुरु आहे आणि यामध्ये श्रीवर्धनच्या पर्यटन आकर्षणांचा समावेश अधिक आकर्षक पद्धतीने वाढवला जाईल. श्रीवर्धन समुद्रकिनार्‍याच्या स्वच्छतेसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्वयंसेवकांसोबत एक महत्त्वपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी 7 वाजता महिंद्राच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेचा श्रीवर्धन समुद्रकिनारा सजवला. यामध्ये श्रीवर्धन नगरपरिषदेने स्वच्छतेच्या महत्त्वाच्या उपाययोजना राबविल्या, ज्यात हँड ग्लोव्हस, गार्बेज बॅग्स, ट्रॅक्टर यांसारख्या सुविधा दिल्या. प्लॅस्टिक कचरा, बाटल्या, झाडांचा कचरा, मासेमारीच्या जाळ्यांचा समावेश करत संपूर्ण किनारा स्वच्छ करण्यात आला.

याप्रसंगी सर्व सहभागी व्यक्तींनी माझी वसुंधरा पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. महिंद्राच्या स्वयंसेवकांना कोकणी स्पेशल नाश्त्याची सोय नगरपरिषदेमार्फत करण्यात आली. श्रीवर्धन नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि महिंद्राचे स्वयंसेवक यांसह 80 जणांचा या यशस्वी मोहिमेत सहभाग होता.

या यशस्वी मोहिमेने, खासदार सुनिल तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर्धनच्या विकासासाठी एक सकारात्मक दिशा दिली आहे, जी इतर शहरांना प्रेरणा देणारी ठरली आहे. श्रीवर्धन नगरपरिषद हा एक आदर्श मॉडेल बनला आहे आणि भविष्यात होणार्‍या माझी वसुंधरा अभियानांमध्ये या कामगिरीचा प्रभाव दिसेल, अशी टिप्पणी खासदार सुनिल तटकरे यांनी केली.

स्वच्छतेसाठी मोहीम

श्रीवर्धन नगरपरिषदेसाठी माझी वसुंधरा 5.0 अभियानासाठी तयारी सुरु आहे आणि यामध्ये श्रीवर्धनच्या पर्यटन आकर्षणांचा समावेश अधिक आकर्षक पद्धतीने वाढवला जाईल. श्रीवर्धन समुद्रकिनार्‍याच्या स्वच्छतेसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्वयंसेवकांसोबत एक महत्त्वपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी 7 वाजता महिंद्राच्या स्वयंसेवकांनी स्वच्छतेचा श्रीवर्धन समुद्रकिनारा सजवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT