कर्जत तालुक्यातून वाहणार्या उल्हास व पोश्री नदीत वाळूमाफियांकडून अवैध वाळूउपसा करण्याचे काम सुरू आहे. Pudhari News Network
रायगड

रायगड : कर्जतच्या उल्हास, पोश्री नद्यांमधील वाळू उपसा सुरु

नद्या पोखरून अवैध वाळू उत्खनन करणार्‍यांविरोधात महसूल विभाग कारवाई कधी; पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

पुढारी वृत्तसेवा

नेरळ : आनंद सकपाळ

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास व पोश्री नदीत वाळूमाफियांकडून अवैध वाळूउपसा करण्याचे काम सुरू आहे. शासनाने वाळू उत्खनन करण्यासाठी स्वामित्व शुल्क बंद केले असल्यामुळे कर्जत तालुक्यातील उल्हास व पोश्री नदी मध्ये सुरू असलेले वाळू उत्खनन अवैध व अनधिकृतपणे केले जात आहे का? व अशा पध्दतीने नद्या पोखरणारे व अवैध वाळू उत्खनन करणार्‍यान विरोधात महसूल विभाग कारवाई करणार का? असे प्रश्न मात्र पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

एकीकडे राज्यात महाराष्ट्र शासनाकडून वाळू उत्खनन करण्यावर बंदी घातली असताना, मात्र कर्जत तालुक्यात उल्हास व पोश्री नद्यांमध्ये दिवसाढवळ्या राज रोशपणे वाळू उत्खनन करण्याचे काम सुरू असल्याने, व संबंधित महसुल विभागाच या कडे होणारे दुर्लक्ष पाहाता हे अवैध वाळू उत्खनन कुणाच्या? वरदहस्तांणे सुरु आहे. असा देखील प्रश्न पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.

एकीकडे राज्यात महाराष्ट्र शासनाकडून वाळू उत्खनन करण्यावर बंदी घातली असताना, कर्जत तालुक्यातील उल्हास व पोश्री नदीमध्ये सरास होणारा वाळू उपसा पाहाता महाराष्ट्र राज्य शासनाने कर्जत तालुक्यातील उल्हास व पोश्री नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी स्वामित्व शुल्क कर सुरु करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांना पारित केले आहेत का? व त्यानुसार उल्हास व पोश्री नदीच्या पात्रातून सदर वाळू उपसा हा कायदेशीर केला जात आहे का? असा प्रश्न देखील पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. या संदर्भात संबंधित महसुल विभागाने सामान्य जनतेच्या प्रबोधनाकरीता हा सुरू असलेला वाळू उपसा कायदेशीर की अवैध या संदर्भात सामान्य जनतेचे निरसन करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे ही पर्यावरणप्रेमी व नागरिकांकडून बोलले जात असल्याने, या अवैध वाळू उत्खनन करणार्‍यावर संबंधीत महसुल विभागाकडून कार्यवाही होणार की नद्यांचे विद्रूपीकरण करणार्‍या वाळूमाफियाना पाठीशी घालण्याचे काम होणार या कडे मात्र पर्यावरणप्रेमी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बेकायदेशीर वाळू उत्खनना संदर्भात कार्यवाही करण्याबाबत आमच्या सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना आदेश देण्यात आले असुन, त्यांची पथके देखील तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील उल्हास व पोश्री नदीमधील अनाधिकृत व बेकायदेशीर वाळू उत्खनन विषय हा आमच्या स्तरावरून गांभीर्याने घेतला जाईल.
धनंजय जाधव, तहसिलदार , कर्जत तालुका, रायगड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT