Raigad Ropeway: रायगड रोपवेवर थरारक प्रात्यक्षिक; पाहा व्हिडिओ Pudhari Photo
रायगड

Raigad Ropeway: रायगड रोपवेवर थरारक प्रात्यक्षिक; पहा व्हिडिओ

एनडीआरएफ, पोलीस व प्रशासनाचा संयुक्त सहभाग

पुढारी वृत्तसेवा

रायगड: रायगड किल्ला रोपवेवर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य कसे करावे, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी गुरुवारी सकाळी थरारक मॉक ड्रिल पार पडला. या सरावात दोरीच्या सहाय्याने बचावाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. विविध विभागांच्या संयुक्त सहभागातून या यंत्रणांमधील समन्वयाची चाचणी घेण्यात आली.

या सरावावेळी एनडीआरएफ ०५ बटालियन पुणेचे सहाय्यक कमांडंट श्री. निखिल मुद्‍होळकर, निरीक्षक श्री. अंकित कुमार, श्री. नितीन सोकाशी, महाड उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. शंकर काळे, नायब तहसीलदार श्री. आर. निकम, रायगड रोपवे प्राधिकरणाचे श्री. एस. भालेराव तसेच रायगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल र. देशमुख उपस्थित होते.

या मॉक ड्रिलमध्ये एकूण ९३ जवान व कर्मचारी सहभागी झाले. त्यामध्ये –

एनडीआरएफ पथक : २७

अग्निशमन दल : १५

रायगड रेस्क्यू टीम : ३०

रायगड पोलीस : १०

आरोग्य विभाग : ०६

याशिवाय सरावासाठी २ रुग्णवाहिका आणि १ अग्निशमन वाहन तैनात करण्यात आले होते.

सरावाचे उद्दिष्ट

रोपवेवर अडकलेल्या प्रवाशांचा तातडीने बचाव, जखमींना सुरक्षितपणे आरोग्य विभागाकडे पोहोचवणे, तसेच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व प्रशासन यांच्यातील कार्यक्षम समन्वय तपासणे हा या मॉक ड्रिलचा मुख्य हेतू होता.

या सरावातून प्रत्यक्ष दुर्घटना घडल्यास सर्व यंत्रणा सज्ज असून त्वरित व समन्वयाने कार्य करण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT