Roha road bike collision
कोलाड : रोहा मार्गावरील संभे गावाजवळील मोरी परिसरात स्कुटी आणि मोटारसायकलीची भीषण धडक होऊन दोन जणांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. ५ ) रात्री घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९.३० वाजता दिनेश भिकू पवार हे त्यांच्या ( MH-06-BJ-3318) मोटारसायकलीवरून धाटाव ते कोलाड या दिशेने प्रवास करत होते. त्याचवेळी जावीर इब्राहिम शाह, (रा. धाटाव) हे त्यांच्या स्कुटीवर ( MH-06-CB-3701) साक्षीदारासोबत कोलाडहून धाटावकडे जात होते. संभे गावाजवळ मोरी परिसरात स्कुटी चालक जावीर शाह यांनी चुकीच्या दिशेने येत मोटारसायकलीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दिनेश भिकू पवार (रा. विठ्ठलनगर, पो. रातवड, ता. माणगाव) तसेच स्कुटी चालक जावीर इब्राहिम शाह (मुळगाव कशिनगर, उत्तर प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोन अन्य प्रवासी अशपाक मोहम्मद फारुख अली (रा. शक्तीनगर, कशिनगर, उत्तर प्रदेश) आणि मोहन पवहारी सिंह (रा. सिधावे टोला, कशिनगर, उत्तर प्रदेश) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा, नागोठणे आणि कोलाड पोलिस ठाण्यांच्या संयुक्त पथकाद्वारे भोजकर करत आहेत.