उत्सवाच्या तयारीवर पाणी पडते की काय अशी भीती गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे. Image Source Meta AI
रायगड

Raigad Rain Update | गणेशोत्सवावर पावसाचे सावट राहणार

रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची धामधूम

गणेश सोनवणे

रायगड : गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच रायगडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उत्सवाच्या तयारीवर पाणी पडते की काय अशी भीती गणेशभक्तांमध्ये निर्माण झाले आहे. ऑगस्टमध्ये पूर्ण विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. पावसात सातत्य नसले तरी अधूनमधून जोरदार सरी येत आहेत. सध्या रायगडसह कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे.

7 ते 17 सप्टेेंबर दरम्यान साजर्‍या होणार्‍या उत्सवाची तयारी ऐन बहरात आली आहे. खरेदीसाठी बाजारपेठाही सजल्या आहेत. त्या खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. पण अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे खरेदीवर परिणाम होताना दिसत आहे. ग्राहकांसह दुकानदारांची मोठी तारांबळ उडत आहे. दरम्यान पुढील चार, पाच दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणात गावाकडे निघालेल्या गणेशभक्तांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, पावसाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, महामार्गावरुन प्रवास करताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहतूक कोंडी टाळावी, शक्य झाल्यास पर्यायी मागनि सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने के लेले आहे. गणेशभक्तांच्या सुविधेसाठी रायगड जिल्ह्यात १६ ठिकाणी मदतकेंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT