24 धरणे 100 टक्के भरली pudhari photo
रायगड

Raigad Rain Update | समाधानकारक पर्जन्यवृष्टीने रायगडची जलसंपदा तुडूंब

पुढारी वृत्तसेवा
रोहे : महादेव सरसंबे

रायगड जिल्ह्यात या चालू वर्षी समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील पाणीसाठावर झाला आहे. रायगड जिल्ह्यात 28 धरणक्षेत्रात सरासरी 99 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील 28 धरणापैकी 24 धरणे 100 टक्के भरली आहेत. गेली चार दिवस चालू असलेला पाऊस असाच पुढे पडल्यास उर्वरित धरणे पूर्ण क्षमतेने भरली जातील. यातील उर्वरित 4 धरणे 100 टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणात सर्वात कमी 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून रानीवली धरणक्षेत्रात 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध, त्या पाठोपाठ उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात 93 टक्के पाणीसाठा, अलिबाग तालुक्यातील श्रींगाव धरणक्षेत्रात 9 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.रायगड जिल्ह्यातील 28 धरण क्षेत्रातील पाणीसाठा पाहिल्यास यातील मुरुड तालुक्यातील फणसाड धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध (पाण्याचा विसर्ग सुरू), तळा तालुक्यातील वावा धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध (पाण्याचा विसर्ग सुरू), रोहा तालुक्यातील सुतारवाडी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), पेण तालुक्यातील आंबेघर धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रींगाव धरणक्षेत्रात 99 टक्के पाणीसाठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरु ), घोटवडे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरु ), ढोकशेत धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), कवेळे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), उन्हेरे धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू)

पावसाची उघडझाप सुरुच

ऐन गणेशोत्सव तोंडावर असतानाच रायगडमध्ये वरुणराजाने पुन्हा जोर धरल्याचे दिसत आहे.गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे गणेशोत्सवाच्या खरेदी,विक्रीवर मोठा परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. येत्या पाच,सहा दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. मध्यंतरी पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने उष्म्यातही कमालीची वाढ झाली होती. पण आता गेल्या चार दिवसांपासून वरुणराजा पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे त्याच्या तयारीवर पावसाचे पाणी पडत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरणक्षेत्रात 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध, कुडकी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), रानीवली धरणक्षेत्रात 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध, म्हसळा तालुक्यातील पाभरे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरु ), संदेरी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), महाड तालुक्यातील वरंध धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), खिंडवाडी धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), कोथुर्डे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), खैरे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), कर्जत तालुक्यातील साळोख धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध, अवसरे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), कलोते-मोकाशी 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), डोणवत धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), पनवेल तालुक्यातील मोरबे धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध ( पाण्याचा विसर्ग सुरू ), बामणोली धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उसरण धरणक्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध, उरण तालुक्यातील पुनाडे धरणक्षेत्रात 93 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT