पोलादपूर : पोलादपूर शहर आणि परिसरात पावसाची सतत धार सुरूच असून सावित्री नदीपात्राच्या पाणी पातळीत सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास अचानक वाढ होऊन पुराच्या पाण्याने नागरी वस्तीत शिरकाव केल्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना विस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
सावित्री नदी पाणी पातळी वाढ झाल्यानंतर तात्काळ पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे नगराध्यक्ष अस्मिता पवार पीएसआय सतीश पवार व महसूल अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास विस्थापित होण्याच्या सूचना आणि मार्गदर्शन केले आहे.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास यांच्या घरात पाणी शिरले अशा नागरिका तात्काळ स्थलांतर व्हावे नगरपंचायत व अन्य ठिकाणी विस्थापित कुटुंबांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले.
क्षेत्रपाळ येथे सकाळी झालेल्या भूत्खलनाबाबत तहसीलदार कपिल घोरपडे यांना विचारले असता ते म्हणाले की, पाटील चारच्या सुमारास भूत्खलनाची खबर मिळतात सर्व प्रशासकीय अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घटनास्थळी धाव घेऊन एन डी आर एफ ची टीम प्रचारण करण्यात आली सर्व परिस्थिती सध्या नियंत्रणात असून या परिसरातील सर्व कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची सांगितले. दरीडीचा सुमारे आठशे मीटरचा प्रवास मोठा अंतर असल्याने नागरिक भीतीच्या छायेत होते. मात्र प्रशासनाने तातडीने धाव घेत येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
प्रशासन आणि प्राथमिक जबाबदारी म्हणून या नागरिकांना तातडीने घरकुल उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी असल्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले. याबरोबरच नाणेघोड येथे भूत्खलन धोका लक्षात घेऊन येतील ते ३३ कुटुंबातील ६९ नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये ३२ पुरुष,३१ स्त्रिया,६ लहान मुले, अशी एकूण 69 नागरिकांना विस्थापित केले आहे. अशी ही त्यांनी सांगितले. महाबळेश्वर घाटमाथा कशेडी घाटमाथा तसेच पोलादपूर परिसरात सध्या पावसाचे प्रमाण अधिक असून नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहनही तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले आहे.