पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 10 जणांना अटक  File Photo
रायगड

Raigad Police Recruitment | पोलीस भरती लेखी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या 10 जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

रायगड जिल्ह्यात 10 ऑगस्ट 2024 रोजी रायगड पोलीस दलाच्या झालेल्या लेखी परीक्षेच्यावेळी कानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स बड डिव्हाईस बसवून गैरप्रकार करण्याच्या हेतूने परिक्षा केंद्रात प्रवेश करताना पेण येथील केंद्रावर एक आणि अलिबाग येथील केंद्रावर पाच अशा सहा परीक्षार्थींना अटक केली होती. त्याच्याकडे पुढील तपास करीत असताना प्राप्त माहितीनुसार या सहा परिक्षार्थींना मदत करणार्‍या दोन युवतींसह 10 जणांना रायगड पोेलिसांनी अटक केली होती.

कानात इलेक्ट्रॉनिक्स बड डिव्हाईस लाऊन परीक्षा केंद्रात प्रवेश करुन गैरप्रकार करण्याच्या तयारीतील गेल्या 10 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेल्या सहा जणामंध्ये रामदास जनार्दन ढवळे (वय 23 रा. नाळवंडी जि.बिड),दत्ता सुभाष ढेंबरे (वय 22 रा. मौजवाडी, जि.बिड), ईश्वर रतन जारवाल( वय 21 रा. अंबड जि. जालना), गोरख गंगाधर गडदे (वय 24 रा. अंबेजोगाई जि.बिड), सागर धरमसिंग जोनवाल (वय 20 रा. गंगापूर जि. संभाजीनगर) आणि शेखर बाबासाहेब कोरडे (वय 27 वर्षे रा. नाळवंडी जि.बिड) यांचा समावेश आहे. या सहा जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता पुढील दहा आरोपींचे धागेदोरे प्राप्त झाले आणि अत्यंत कौशल्याने तपास करून या दहा आरोपींना अटक करण्यात आली.

अटक करण्यात या दहा आरोपींमध्ये कुमारी नागम्मा हनुमंत इबीटदार (वय 20 रा. देगलूर जि. नांदेड), पुनम राम वाणी (वय 23 रा. पडेगाव जि.छ. संभाजीनगर) या दोन युवतींसह पवन त्रंबक बमनावत (वय 25 रा. तळणी जि.जालना.), नारायण निवृत्ती राउत (वय 29 रा. नाळवंडी, जि.बिड), प्रताप उर्फ भावड्या शिवसिंग गोमलाडू (वय 25 रा. वैजापूर जि.छ. संभाजीनगर), अर्जुन नारायण बेडवाल (वय 24 रा. परसोडा जि.छ. संभाजीनगर), मंगेश बालाजी चोले उर्फ चोरमले सर ( वय 34, रा. जळकोट, लातूर), संतोष सांडू गुसिंगे (वय 30 रा. पैठण जि.छ. संभाजीनगर), जीवन मानसिंग नायमने उर्फ एस. राठोड उर्फ करण (जाधव रा. जोडवाडी, जि.छत्रपती संभाजी नगर), जालींदर श्रीराम काळे (वय ३२ वर्षे रा. नाळवंडी जि. बिड) या यूवकांचा समावेश आहे. रायगड पोलीस भरतीसाठीचा लेखी पेपर हा रायगड प्रशासनानेच तयार केलेला असल्याने तो बाहेर कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी बनावट आणि गैरप्रकाराने पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत उत्तरे मिळवून परिक्षेत उत्तीर्ण होण्याच्या हेतूने परिक्षेस बसलेल्या परिक्षार्थीपकी एक परिक्षार्थी आपल्या जवळील छुप्या ब्ल्यूटूथ डिजिटल डिव्हाईसच्या माध्यमातून परिक्षेचा पेपर केंद्रावर मिळाल्यावर फोटो काढून बाहेर पाठवण्यात येतो. त्या पेपर मधील प्रश्नाची उत्तरे त्यांना बाहेरुन मदत करणारे आरोपी, परिक्षार्थीच्या कानातील ब्ल्यूटूथ हिअरीग डिव्हाईसवर सांगणार व परिक्षार्थी ती उत्तरपत्रीकेत लिहीणार अशी गुन्ह्यातील आरोपींची कार्यपद्धती होती. मात्र रायगड पोलीसांच्या सतर्कतेमुळे या आरोपींची ही कार्यपद्धती येथे पूर्णपणे निष्फळ ठरल्याचे रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगीतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT