श्री वीरेश्वर महाराज 
रायगड

महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांना रायगड पोलिस दलाकडून मानवंदना!

निलेश पोतदार

महाड ; पुढारी वृत्‍तसेवा महाडचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवा दरम्यान आज शेवटच्या दिवशी रायगड पोलीस दलातर्फे त्यांना बँड पथकासह रायगड पोलिसांच्या विशेष पथकाकडून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शेकडो शिवभक्त नागरिक उपस्थित होते.

मागील अने क वर्षांपासून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या या छबिना उत्सवासाठी पोलीस खात्यामार्फत मानवंदना देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. यासंदर्भात महाडचे आमदार भरतशेट गोगावले यांनी मागील वर्षी विशेष प्रयत्न करून मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून महाडकर नागरिकांचे असलेली ही अपेक्षा पूर्ण केली होती.

आज झालेल्या या पोलीस मानवंदनेची जबाबदारी महाडचे पीएसआय विशाल पवार यांच्याकडे होती. त्यांच्या समवेत एक अधिक आठ सन्मान गार्ड व पोलीस बँड पथकाचा समावेश होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT