Panvel Rickshaw Taxi Inspection Pudhari
रायगड

RTO Panvel | पनवेलमध्ये १५० रिक्षा-टॅक्सींची तपासणी; मराठी न बोलणाऱ्या १७ चालकांना नोटिसा

एका दिवसात तब्बल १५० रिक्षा व टॅक्सींची तपासणी

पुढारी वृत्तसेवा

Panvel Rickshaw Taxi Inspection

पनवेल : मराठी भाषेत संवाद साधता न येणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांविरोधात पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत एका दिवसात तब्बल १५० रिक्षा व टॅक्सींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी मराठी बोलता येत नसलेल्या १७ चालकांना जागेवरच नोटिसा बजावण्यात आल्या.

पनवेल परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान रिक्षा व टॅक्सींची कागदपत्रे, परवाने तसेच नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. यावेळी काही चालकांना मराठी भाषेत बोलता किंवा प्रवाशांशी संवाद साधता येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित १७ चालकांवर नोटिसांची कारवाई करण्यात आली.

नोटीस बजावण्यात आलेल्या चालकांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून, या कालावधीत मराठी भाषा शिकून प्रवाशांशी संवाद साधता यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नोटीसचा कालावधी संपल्यानंतरही संबंधित चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याचे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

गरज भासल्यास संबंधित रिक्षा अथवा टॅक्सीचा परवाना रद्द करण्याची कारवाईही केली जाऊ शकते, अशी माहिती पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा आत्मसात करावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT