Local Body Elections (File Photo)
रायगड

Raigad news: पनवेल म.न.पा च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रियेचा सुधारित नवीन कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार या आरक्षण प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश मिळाल्याने हा कार्यक्रम पुन्हा राबविण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

विक्रम बाबर

पनवेल : महानगरपालिकेच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत निश्चित करण्याची प्रक्रिया ११ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. मात्र, राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार या आरक्षण प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश मिळाल्याने पनवेल महानगरपालिकेकडून नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांना ६ जागा राखून देणे व सर्वसाधारण महिलांच्या जागांची सुयोग्य पुनर्वाटप करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार सुधारित सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी पुढील कार्यक्रम आखण्यात आला आहे.

१७ नोव्हेंबरला सुधारित आरक्षण सोडत

सुधारित आरक्षण सोडत सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सोडत आदयक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडणार आहे. यावेळी ना. मा.प्र महिलाच्या आरक्षणाची सोडत काढणे व यथास्थिती नियमानुसार सर्वसाधारण महिला जागा नेमून देण्याची कार्यवाही करणे हरकती व सूचना स्वीकारण्यास १९ नोव्हेंबर पासून स्वीकारल्या जातील. सुधारित आरक्षणानंतर नागरिकांकडून येणाऱ्या हरकती व सूचना बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ पासून स्वीकारल्या जाणार आहेत. मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहे.

हरकती दाखल करण्यासाठी मुख्यालयात व्यवस्था

हरकती व सूचना दाखल करण्यासाठी इच्छुकांनी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात (नागरी सुविधा केंद्र) लेखी अर्ज दाखल करावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT