file photo  
रायगड

रायगड : पनवेल-दिवा-वसई रेल्वे मार्ग पूर्ववत; २७ तासांनंतर प्रशासनाला यश

backup backup

पनवेल; विक्रम बाबर : २७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पनवेल-दिवा-वसई रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजून ५ मिनिटाच्या आसपास पनवेल वरून वसईच्या दिशेने जाणारी मालवाहतुक करणारी मालगाडी, पनवेल रेल्वे स्थानकांच्या आसपास रुळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना घडली. ही दुर्घटना इतकी भयानक होती की, या अपघातामध्ये मालगाडीचे ४ डब्बे (व्हागन) हे पलटी झाले होते. तसेच १ ब्रेक व्यागण देखील रुळावरून खाली उतरली होती. त्यामुळे जवळपास एक किलोमीटर पर्यंतचे रेल्वे ट्रॅक उखडले होते. काही ठिकाणी हे ट्रॅक बेंड झाले होते, तसेच स्लीपर देखील तुटल्या होत्या.

या दुर्घटनेनंतर दुरुस्तीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना अथक पर्यत करावे लागले. तब्बल २७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आणि या मार्गावरून पहिली ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रविवारी (दि. १) सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटाने हे कामकाज पूर्ण झाले आहे. हे काम करण्यासाठी सेन्ट्रल रेल्वेच्या 'विराट' क्रेनची मोठी मदत झाली. या क्रेनच्या माध्यमातून रेल्वे रुळावरून खाली घसरलेले डब्बे आणि jsw कंपनीचे स्टील, लोखंडी बंडल उचलून बाजूला काढण्यात प्रशासनाला यश आले.  त्यानंतर युद्धपातळीवर काम करत नादुरुस्त झालेले रेल्वे ट्रॅक बदलण्यात आले. यासाठी तीन जेसीबी, तीन पोकलनची देखील मदत घेण्यात आली. तसेच ५०० हून अधिक कर्मचारी दोन दिवसापासून काम करत होते. दोन दिवसात २३ ट्रेन रद्द करण्यात आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT