तळा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा Pudhari Photo
रायगड

Raigad News | तळा तालुक्यात वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

तळा : तळा शहरासह तालुक्यामध्ये माकडांचा व जंगली प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला असल्याने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा वनविभागाला तळा विकास आघाडीने दिला आहे.

तळा शहरासह तालुक्यामध्ये माकडांचा व जंगली प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला असून स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरे लागत आहे. या गंभीर समस्येकडे वनविभागाचे लक्ष वेधण्यासाठी वृत्तपत्रांचे माध्यमातून निदर्शनास आणून दिली असूनही प्रशासनाने दखल घेतली नाही किंवा पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली नाही. दिवसेंदिवस माकडांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे त्यांचे राहणीमान जंगल सोडून मानवी वस्तीत आल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

लहान मुलांना एकट्याला सोडायची सोय राहिली नाही. या माकडांचा हैदोस इतका वाढला कि शेतकरी देखील कुठल्या प्रकारची शेती करायला तयार होत नाही. काही ठिकाणी शेती पिकली तर पिके हातात येईल याची खात्री नाही. तळा तालुका डोंगराळ दुर्गम असून भात शेती हा एकमेव उदरनिर्वाहाचे साधन असून रान डुक्कारांमुळे नासधुस होत आहे व माकडे भाजीपाला, फळफळा वळ, कडधान्ये, कपडे, वाळवणे अन्नधान्ये चोरून किंवा पळवून नेत आहेत.

घराची कौले काढून बंद घरात शिरून नासधुस करीत आहेत. या माकडांनी अतिशय उच्छाद मांडला असून कायमचा बंदोबस्त करावा. अशा मागणीसाठी तळा तालुक्याच्या वतीने तळा विकास आघाडी निवेदनाद्वारे केली आहे.

21 ऑक्टोबरपयर्यंत मुदत

येत्या 21 ऑक्टोबरपर्यंत दिलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर तळा तालुका विकास आघाडी वन परिक्षेत्र अधिकारी माणगाव, वन परिमंडळ अधिकारी तळा यांना खेळण्यातील माकड देऊन आंदोलन छेडणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT