खांब (नाशिक) : श्याम लोखंडे
कोलाड पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभाराचा फटका अखेर सर्व सामान्य नागरिकांना बसला पुगाव पुई आदिवासीवाडीकडे जाणार्या मार्गावरील तसेच मेन कालव्यावरील साकव पूल दिवसाढवळ्या अचानक कोसळला तर घटनेत पुलावरून मार्ग क्रमण करत असताना आदिवासी बांधवाच्या बकर्या पुलावरून खाली पडून वाहून जात असताना कोणताही विचार न करता मालक तसेच ग्रामस्थांनी एकच धावा करत बकर्यांचे जीव वाचविण्यात यश मिळवले. मात्र पूल कोसळल्याने येथील रहिवाशी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. तर यावर संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर उपाय योजना सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजवातीर कालव्यावरील साकव पूल तुटल्याने पुगांव पुई आदिवासी वाडीतील ग्रामस्थ महिला शाळकरी विध्यार्थी यांचा नेहमीचा रहदारीचा मार्ग रस्त्यामधील कालव्यावरील साकव पुल अचानक कोसल्यामुळे त्यांना येण्या-जाण्याचा रस्ता बंद झाला आहे वाडीतील शाळकरी मुलांना शाळेत तसेच वृद्ध व गरोदर स्त्रियांना दवाखान्यात त्याच बरोबर बाजार खरेदीसाठी जाण्यासाठी त्यांच्यापुढे मोठा प्रश्न पूल तुटल्याने निर्माण झाला आहे. गेली. कित्येक वर्षे या पुलाकडे पाटबंधारे खात्याचा दुर्लक्षितपणा अखेर ग्रामस्थांच्या मार्गावर बेतल्याने मार्ग बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डोळवहाल बंधारा कुंलिका संचनातून बारमाही वाहणारा उजवातीर कालव्यावरील पुई पुगाव आदिवासी वाडी नजीक साकव पूल तुटल्याने त्यांचा रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर हे पाणी थेट आर सी एफ कंपनीला जात असल्याने पाटबंधारे विभागाने व्यापारधोरण स्वीकारले कालव्यावरील साकव पूल मोर्या याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका सदरील ग्रामस्थ नागरीकांना बसत आहेत तर पुई पुगाव खांब पर्यंत बारमाही वाहणारा तसेच आंबा नदीला जोडला गेलेला कळवा आहे. दरवर्षी अधिकारी या कालव्याची पाहणी करतात त्याची लाखोंची दुरुस्ती आणि साफसफाई करतात मात्र असे जीर्ण अवस्थेत असलेले साकव पूल मोर्या यांची रीतसर पाहणी करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदरचे साकव पूल तुटल्याची माहिती संबंधित खाते अधिकारी यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तर यावर लवकरच उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी पुई ग्रामपंचायत माजी सरपंच संजय मांडळुस्कर,सुनील दळवी,पुगांव ग्रामपंचायत मा. सदस्य सुधीर शेळके, तसेच वाडीवरील वसंत कोळी, राम वाघमारे, अनिल वाघमारे, संतोष वाघमारे, विजय जाधव, रामू कोळी, परशुराम जाधव, सिताराम जाधव, ज्ञानेश्वर कोळी,सुनील जाधव, राजेश जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष जाधव, अनिल वाळेकर, रमेश जाधव, आण्णा पवार, राम कोळी, चंद्रकांत वाघमारे, गणेश वाघमारे पुगाव व पुई गावातील ग्रामस्थ पुगांव पुई आदिवासी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
येथील आदिवासी नागरिक दररोज मोल मजुरी करतात हातावर कमावणार मग पोटभर खाणार तर काहीजण शेळी पालन करतात त्यावर आपले कुटुंब चालवतात, मात्र आजच्या घडीला त्यांच्यावर कळवा मार्गावरील पुल कोसळल्याची घटना घडल्याने मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे या ठिकाणी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करत लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.