मुरुड जंजिरा समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले 
रायगड

Raigad News : मुरुड जंजिरा समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रविवार सुटी आणि गुलाबी थंडीमुळेपर्यटकांचीरेलचेल; ताज्या मासळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मुरुडकडे वळले

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा ः मुरुड शहरात मस्त गुलाबी थंडीचे वातावरण असल्याने रविवार सुटी पर्यटक मुरुडच्या किनाऱ्यावर येणे पसंत करत आहेत.थंडीत विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी राहणार आहे दिवाळीला लागून आलेल्या वीकएण्डमुळे पर्यटनप्रेमींना मोठा लाभ झाला असून, मुरुड शहरात पाऊस गेल्याने वातावरण अल्हाददायक व सुंदर आहे.समुद्र शांत असल्याने मासेमारी चांगली होत असल्याने पर्यटकांना मनसोक्त ताजे मासे खाण्याचा आनंद घेत आहेत.

मुरुड समुद्रकिनारी असलेली सर्व हॉटेल रंगरंगोटी,विविध रंगाची रोषणाई,नवनवीन चविष्ट पदार्थांचे स्टोल समुद्रावर घोडेस्वारी,मोटार बाईक,पाणीपुरी,भेळपुरी अशा विविध स्टॉलने किनारा बहरला आहे. नगरपालिकेने समुद्रकिनारी असलेली विश्रामधाम बागेचे नूतनीकरण केल्याने त्याचा लाभ पर्यटकांना झाला आहे. पालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी दिवसातून 3 वेळा स्वच्छ करतात,मुरुडला असणारे जलदुर्ग जंजिरा व पद्मदुर्ग पर्यटकांसाठी सज्ज झालेत.पार्किंग झाल्याने पर्यटक गाडी पार्क करून तत्काळ समुद्रात उतरतात. मुरुडपासून जवळच असणारे गारंबी धारण,कुडे मांदाड लेणी,खोकरी,दत्तमंदिर या पर्यटन स्थळावर स्वच्छता करून खाण्यापिण्याचे स्टॉल करण्यात आलेत. सलग सुट्ट्या असल्याने पर्यटकांच्यास्वागतासाठी मुरुड तालुका सज्ज झालाआहे.

गेली 2 वर्ष कोरोनामुळे हॉटेल व्यावसाय डबघाईला आला होता.या वर्षी दिवाळीला सलग सुट्टयाअसल्याने बुकिंग चांगली होती.पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात मुरुडला यावे आम्ही त्यांना उत्तम सेवा देऊ व हॉटेल भाडे देखील योग्य दारात घेऊ.पर्यटकांनी 4 दिवस राहण्यासाठी यावे.
मनोहर बैले, हॉटेल व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT