पेण ः स्वप्नील पाटील
हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात आणि जानेवारीमध्ये येणार्या मकरसंक्रांत सणासाठी रायगड जिल्हयातील बाजारपेठा सजल्या आहेत. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये मडकी, तिळगुळ, पतंग, ऊस, फुले आदी वस्तू डेरेदाखल झाल्या आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी पहायला मिळत आहे.
मकरसंक्रांतीच्या दिवशी अनेक महिला बोरे, हरभभरे, ऊस यांसारख्या वस्तू सुगडीत भरून तो वाण म्हणुन दिला जातो. या दिवशी अनेक युवक मोकळ्या मैदानात जाऊन किंवा आपल्या टेरेस वरून विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पतंग उडवून आपला सण साजरा करत असल्याने पतंग देखील बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या आहेत. त्याचप्रमाणे पेणमध्ये कुंभारांनी तयार केलेली छोटी कडकी जी सुगड म्हणून वाण देण्यासाठी वापरली जातात, ती मडकी सुद्धा बाजारपेठेत दाखल झाली आहेत. त्याचप्रमाणे अष्टरची फुले, ऊस, हरभरे, बोर, तसेच भेटवस्तू म्हणून देण्यात येणार्या विविध प्रकारच्या वस्तूदेखील विक्रीसाठी पेणच्या बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवल्या गेल्या आहेत.
दरम्यान, यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणार्या वस्तूंना पसंती दिली जात असून महिलांच्या मागणीनुसारच बाजारपेठेत वाण म्हणून प्लास्टिकच्या साहित्याला फाटा दिल्याचे दिसून येत आहे. तेल लावण्याचा ब्रश, तेल भरण्याची बाटलीसह इतर साहित्य कापडी पिशव्या वाणाच्या स्वरुपात हळदी-कुंकवासाठी आलेल्या महिलांना दिले जात आहे.त्यावस्तूना मागणी बाजारपेठ मध्ये असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन महिला करतात.
तिळगुळ आणि काळ्या कपड्यांचे महत्त्व
मकरसंक्रांत दरम्यान तिळगुळ, तिळाच्या वड्या, तिळाचा हलवा तसेच कपड्यांना विशेष महत्त्व असते. या कालावधीत थंडी असते आणि तीळ, काळे कपडे हे उष्ण असल्याने या हंगामात तिळाचे पदार्थ आणि काळ्या कपड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झालेले असते. तर मकरसंक्रांतपासून अनेक युवक विविध प्रकारच्या रंगीबेरंगी पतंग उडवत असल्याने सायंकाळच्या सुमारास आभाळात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत पतंग उडवून त्या पतंग कटण्याची स्पर्धा या हंगामात पहायला मिळते.