Rigad News | रोहा तालुक्यात पहूर वाळंजवाडी गोमाशी डोंगरावर सापडले ऐतिहासिक अवशेष,  
रायगड

Raigad News | रोहा तालुक्यात पहूर वाळंजवाडी गोमाशी डोंगरावर सापडले ऐतिहासिक अवशेष, तालुक्यातील पाचवा किल्ला म्हणून नोंद कराः शिवप्रेमींची मागणी

गड संवर्धन मोहिमेतून आली अनेक रहस्ये समोर, तटबंदी, पाण्याचे टाक्याचे अवशेष

पुढारी वृत्तसेवा

श्याम लोखंडे

खांब : रोहा तालुक्यातील वाळंजवाडी पहूर येथील पूर्वीच्या काळातील ओळखला जाणारा तसेच केदार जननी मातेच्या पहाडी कड्यालागत असलेल्या गोमाशी डोंगरावर गड संवर्धन मोहिमेतून शिवप्रेमींना ऐतिहाकिस अवशेष सापडले आहेत. त्यामुळे येथे पूर्वीचा ऐतिहासिक गड किल्लाच असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याठिकाणी त्यांना वरती काही ठिकाणी पाण्याचे टाकं तसेच गडाला असल्यासारखे तटबंदी जोथे ऐतिहासिक चिरे, कौलांचे आणि मातीच्या मडक्यांचे तसेच माती विटांचे अवशेष सापडले आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक डोंगराला गडाचा दर्जा मिळावा अशी मागणी शिव प्रेमींच्या माध्यमातून पुरातत्व खाते आणि रायगड प्राधिकरण विभाकडे केली जात आहे.

रोहा तालुक्यामध्ये अवचित गड, घोसाळेगड, सुरगड आणि बिरवाडी( भवानी गड) गड असे चार किल्ल्यांची नोंद आहे. रायगड टूर गाईडचे सदस्य आनंद सोनाराम सानप,किशोर सावरकर , कृष्णाराम जाधव , केतन फुलपगारे, सौरभ घरट, दत्तात्रेय सावंत काका हे रोहा तालुक्यात इतिहासाच्या आणि काळाच्या ओघात लुप्त झालेले गडकोट किल्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत.

कोणते ऐतिहासिक अवशेष सापडले

पहूर वाळंजवाडी आणि सभोवतालचा प्रदेश हा ऐतिहासिक शिल्प वीरगळ सतिशीला यांनी समृद्ध आहे. आणि त्याचेच संदर्भ घेऊन रायगड टूर गाईड सर्विस चे आनंद सानप यांनी भोवतालच्या परिसरात शोध मोहिमा आणि अभ्यास मोहिमांना सुरुवात केल. त्यांनी त्याची ही कल्पना त्यांचे कृष्णराम जाधव, किशोर सावरकर, सौरभ घरट , दत्तात्रेय सावंत काका, यांना दिली. या शोध मोहीम दरम्यान वाळंजवाडी हद्दीत असणाऱ्या आणि पहूर कडील बाजूला असणाऱ्या एका डोंगरावर त्यांना किल्ल्याचे असणारे काही अवशेष आढळून आले. डोंगरावर आठ पाण्याचे टाक, कौलाची खापरे मटक्याची खापरे, तटबंदी दगडाचे चीरे , विटांचे अवशेष असे काही भरपूर सारे काही ऐतिहासिक काळातील अवशेष मिळाले आहेत.

तर वाळंजवाडी गावच्या हद्दीमध्ये असणारा आणि पहूर गावच्या वाटेवर असणारा हा डोंगर याला पूर्वीचे काळात गोमाशीचे डोंगर असे नाव होते परंतु इथून पुढे हा देखील एक किल्ला आहे अशी नोंद शासन दरबारी केली जाईल अशी मागणी होत आहे. असून रायगड टूर गाईड च्या सदस्यांनी आतापर्यंत गेली दीड दोन वर्षभरात वेगवेगळ्या दिवशी शोध मोहिमा घेतल्या आणि या शोध मोहिमांमध्ये त्यांना पाण्याचे टाक मातीच्या मटक्याची खापरे चिरेबंदी जोथ्याचे अवशेष तसेच तटबंदीचे अवशेष असे भरपूर सारे ऐतिहासिक अवशेष मिळाले आहेत.

वर डोंगर माथ्यावरून नजरेतून समोर सुरगड,घनगड, तैलबैला, सुधागड, कुर्डू, कोकण दिवा, अवचित गड, केदार जननी डोंगर, कुंडलिकेचा खोरे, सह्याद्री पर्वयाची भली मोठी रांग, भिरा टाटा पॉवर जणींचा डोंगर आणि त्याचा भुयार तसेच पाण्याचं टाक असे इतिहासाचे साक्ष देऊन जात आहे. तसेच वर वन प्राणी यांची देखील पाऊल खुणा आणि त्यांची वहिवाट जाणवत आहेत वेगवेगळे चिरे आणि काही तटबंदी चिरे पाण्याचे टाकं आणि त्याला कडेला त्याकालीन पोळ होल अच्छा दान म्हणजे पाण्याच्या टाकीवरती सावली क्षेत्र असे काही ठिकाणी साक्ष देत आहेत. तसेच पायथ्याशी देखील काही शिवकालीन कडे हे साक्ष देत असल्याचे निदर्शनास दिसून येत आहेत.

शासनाकडे पाठपुरावा करणार

अनेक वर्षे गड संवर्धनाचे कार्य करत असताना या परिसरात सत्यशील विरगळ आढळून येत असल्याने गेली दोन वर्षे सातत्याने या डोंगरावर शोध मोहीम आणि काम करत असताना या ठिकाणी संवर्धन करत असतांना ऐतिहासिक शिवकालीन अवशेष त्यामध्ये पाण्याचे टाकं,तटबंदी असलेले कठडे, शिवकालीन चिरे,कौलांचे, मडक्यांची खापर, विटांचे अवशेष असे सापडत आहेत त्यामुळे याला तालुक्यातील चार गडकिल्यांप्रमाणे गडकिल्याचा दर्जा मिळावा तसेच त्याची नोंद व्हावी. या उद्देशाने इतिहास अभ्यासक यशवंत पुत्र मोहन फराटे हे पाहणी करणार असून तद्नंतर ऐतिहासिक किल्ला म्हणून याची पुरातत्व खात्याने आणि रायगड प्राधिकरण विभाकडे याला गड किल्ला म्हणून ओळखला जावा अशी मागणी करण्यात येणार आहे. अशी माहिती आनंद सोनाराम सानप रायगड टूर गाईड सर्विस यांनी दिली

शासनाने अशा मोहिमांसाठी निधी द्यावा

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड किल्ल्यांचे जतन संवर्धन करणाऱ्या गडप्रेमी शिवप्रेमी व संस्था यांना शासकीय निधीची तरतूद करावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणा तसेच इतिहासाची ओळख पुढच्या पिढीला निर्माण व्हावी तसेच पडक्या वस्तू दुरुस्त करणे, किल्ल्यांचे पावित्र्य राखणे यासारखे उपक्रम काही सामाजिक संस्था उपक्रम राबवत असतात .या तरुणांना गड किल्ल्यांचे संवर्धन जतन या गोष्टींना शासकीय निधी देण्याची शासनाने तरतूद करण्याची मागणी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना जिल्हाध्यक्ष भिवा पवार यांनी व्यक्त केले.

गड किल्ले संवर्धन करण्यासाठी शिवप्रेमी संस्था आणि उपक्रमांमध्ये सहभागी होतात. शासनाने या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी काही खोदकाम, शोधक किल्ल्यांचे शोध, स्वच्छता करण्यासाठी लागणारे साहित्य यांना शासनाने निधी उपलब्ध केली तर यामध्ये काम करणाऱ्या संस्था गडप्रेमी यांची संख्या वाढेल व गड किल्ल्यांची आणि ऐतिहासिक वस्तू संवर्धनातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारशाचे जतन होईल

डोंगराचे ऐतिहासिक महत्‍व

पूर्वीचा काळी व्यापार करणारे व्यापार व्यावसायिक कोलाड कुर्डू मानगड लिंग्या आणि भोर घाट कडे जाणारा मार्ग त्यामुळे ऐतिहासिक काळात याचा टेहळणीसाठी वापरत केला जात असावा असे तर्व्य व्यक्त होत आहेत. त्यामुळे या डोंगरावर साक्ष देणारे काही ऐतिहासिक शिवकालीन अवशेष या दुर्ग गड संवर्धन करणाऱ्या शिवप्रेमीना सापडल्या आहेत. मात्र यावर पुरातत्व विभाग आणि रायगड प्राधिकरण विभाग त्याच प्रमाणे काही इतिहासाचे अभ्यासक तज्ज्ञ यांवर कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT