तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजना कालावधी उलटूनही योजना पूर्ण केलेली नाही Pudhari News Network
रायगड

Raigad News | जलजीवन योजनेनंतरही चिंचोटी गाव तहानलेले

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रमेश कांबळे

तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून चिंचोटी गावामध्ये जलजीवन मिशन योजना कालावधी उलटूनही योजना पूर्ण केली नाही. या योजनेमध्ये सरकारी निधीचा लाखो रूपयांचा अपहार केला असून या योजनेशी संबधित असणार्‍यांविरूध्द् भारतीय न्यायसंहिता भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश नारायण पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे केला आहे

तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले आहे की, चिंचोटी गावामध्ये ग्रामपंचायत चिंचोटीच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजना सन 2021-2022 मध्ये राबविण्यात आली. सदरच्या योजनेचे काम करण्यासाठी रक्कम रूपये 1 कोटी 98 लाख 58 हजा 100 रूपयांचा निधी लोक वर्गणीतुन उभा करण्यात आला. या निधी पैकी चिंचोटी गावाच्या नळ पाणी योजणेकरीता 76 लाख 16 हजार 345 रूपयांच्या निधीची तरतुद शासनाने केली होती व आहे.

ही योजना चिंचोटी गावामध्ये राबविण्यासाठी ग्रामपंयत चिंचोटीच्या 2 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या ग्रामसभेध्ये कामाला मंजूरी देण्यात आली. सदरच्या योजनेसाठी तांत्रिक मान्यता 28 नोव्हेंबर 2022 रोजी देण्यात आली. तसेच काम पूर्ण होण्याच्या 27 नोव्हेंबर 2023 हा होता. सदरच्या कामाची अमंल बजावणी यंत्रणा जल जीवन पुरवठा जिल्हा परिषद रायगड यांची होती. ही जल जीवन योजना राबविण्याची महत्वाची जबाबदारी ही ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, कार्यकारी अभियंता, उपविभाग अभियंता या लोकसेवकांवर होती. सदरच्या योजनेचा ठेका कंत्राट हे झाद इंटरप्रायझेस यांना देण्यात आला होता.

चिंचोटी गावामध्ये सध्या प्यायला पाणी नाही ही वस्तुस्थिती आहे. महिला सरपंचांच्या खुर्चीवर पतीदेव बसून ही योजना अपयशी झाली आहे. या योजनेत भ्रष्टाचार करणार्‍यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली असून जिल्हा परिषदेने प्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.
अ‍ॅड. राकेश नारायण पाटील, तक्रारदार, सामाजिक कार्यकर्ते

या योजनेच्या बाबतीत चिंचोटी गावामध्ये कंत्राटदार झाद इंटरप्रायझेस यांनी गावातील काही आळयामध्ये पाईप लाईन टाकली तर काही आळयांमध्ये अजूनपर्यंत पाईप लाईनच पोहचलेली नाही. तर काही ठिकाणी या याजनेचे पाईप उघडयावर सोडले आहेत.

कंत्राटदाराच्या वतीने सह कंत्राटदार म्हणून काम करणारे गावातील काही कंत्राटदारांनी पाईपवरून नळ कनेक्षन जोडण्यासाठी गावातील नागरिकांकडून, महीलांकडून प्रत्येक नळ कनेक्शन मागे रक्कम रूपये 250 वसुल केले आहेत. सदरचे 250 घेण्याचा ठेकेदाराला कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे लोकांकडून एकप्रकारे पाणी न देताच लुट केली आहे. त्या पैसे घेणार्‍या विरूध्द् गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.

नळ योजनेसाठी पाण्याची टाकी उभी करण्यात आली असून पाण्यासाठीची विहीरही बांधण्यात आली आहे. तसेच केबीनही बांधण्यात आली असून सदरचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची स्थानिक नागरीकांमध्ये चर्चा आहे. पिण्याचे पाणी ही माणसांची मुलभुत गरज आहे. माणूस त्यासाठी काहीही करण्यास तयार असतो. चिंचोटी गावातील महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेूवन पाणी भरावे लागते. माणूस त्याप्रमाणे त्याचे म्हणणे जनतेसमोर मांडू शकतो. परंतु मुक जनावरे यांना होणारा त्रास हा कोणाकडे सांगू शकत नाहीत. जनता पाण्याकरीता शासनाने राबविलेल्या योजनेप्रमाणे व ग्रामपंचायतीने पाण्याच्या मागितलेल्या वर्गणी प्रमाणे भाबडेपणे वर्गणी पाण्याकरीता जमा करत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT