पोलादपूर : पोलादपूर वाई महाबळेश्वर सुरुर राज्य मार्गावरील पावसाळी हंगामातील दरड सह मातीचा ओसरा झाड पडण्याचे सातत्य कायम राहिले आहे. या मार्गावर मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास पोलादपूर हद्दीतील कुंभलवणे फाटा येथे मातीचा ओसरा तर कापडे ते पायटा या दरम्यान झाड पडल्याने काही तासाकरता रस्ता दोन्ही बाजूने ठप्प झाला होता. यामुळे आंबेनळी घाटात दरडीची भीती वाहनधारकांच्या मनात कायम आहे. या घटनेची माहिती मिळतात पोलादपूर आपत्ती निवारण लक्ष सह पोलादपूर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साह्याने दगडमाती तात्काळ हटवण्याचे काम सुरू केले.
दरम्यान वेधशाळेने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सह घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गेली अनेक वर्षे दरड ग्रस्त बनलेला आंबेनळी घाट मार्ग दरवर्षी प्रमाणे पावसाळा च्या हंगामात दरड किंवा अपघात झाल्यास चर्चेत येत असतो. गेल्या चार पाच दिवसा पासून सुरू झालेल्या संततधार पावसात या राज्य मार्गवरील पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्य खाली असणाऱ्या हद्दीत दरड कोसळल्याने रस्ता पूर्ण पणे बंद झाला आहे.
दरड कोसल्याची माहिती मिळताच पोलादपूर चे तहसीलदार कपिल घोरपडे ,पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी तातडीने जेसीबी सह घटनास्थळी दाखल होत परिस्थिती ची पाहणी करत दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू केले.
गेल्या 24 तासात पोलादपूर मध्ये 66 मी मी प्रतापगड खोऱ्यात 47 तर महाबळेश्वर खोऱ्यात 37 मी मी पावसाची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मार्गवर रस्ता रुंदीकरण चे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी डोंगर उभे कापण्यात आल्याने दरडीचा धोका आगामी काळात मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे यासाठी प्रवासी वर्सगासह प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.