खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे.  Pudhari
रायगड

Raigad News | पोषण आहारात सापडला मेलेला उंदीर

वडखळमध्ये अंगणवाडीतील प्रकाराने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

पेण | एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी क्र. 03 मध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांकरीता घरपोच वाटप होणार्‍या मल्टी मिक्स सिरीयल्स अ‍ॅण्ड प्रोटीन्स खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे. यानंतर त्वरित वाटपबंद करण्यात आले. यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वडखळ हद्दीत अंगणवाडीमध्ये ही घटना घडली असून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या घटनेची दखल घेतली आहे. अंगणवाडी सेविकेला खाऊंचे पाकिट वाट पकरताना पिठात एक कडक वस्तू आढळल्याने त्यांनी बारकाईने निरखून पाहिल्यावर त्यांच्या हे लक्षात आले. सदर वितरण करण्यात आलेल्या या खाऊच्या वाटपाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गेले तीन दिवसात मुलांच्या घरी वाटप केलेली सर्व पाकिट परत मागवून ती बालविकास प्रकल्प कार्यलयात पाठविण्यात येणार आहेत.

बालकांकरीता घरपोच वाटप करण्यासाठी येणारे मल्टी मिक्स सिरीयल्स अँण्ड प्रोटीन्स चे बैच न MMCC 1351,P, उत्पादन 5|1|2025 या पाकिटामधील खाऊमध्ये मेलेला उंदिर आढळून आला. मात्र अंगणवाडीसेविका यांच्या लक्षात हे आल्याने मोठा बाका प्रसंग टळला आहे. त्यांनी तात्काळ सरपंच व पोलीस स्टेशप यांना या घटनेची खबर दिली. खबर मिळताच वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, वरीष्ठ अधिकारी यांनी भेट सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT