रेवदंडा येथे भाड्याच्या खोलीमधून पाच लाखांची चोरी FILE
रायगड

Raigad News | रेवदंडा येथे भाड्याच्या खोलीमधून पाच लाखांची चोरी

रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार

पुढारी वृत्तसेवा

रेवदंडा : रायगड महिला पोलिस म्हणून रेवदंडा पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना, वास्तव्यासाठी घेतलेल्या भाडयाच्या रूममधून 5 लाख रूपयांची चोरी झाल्याची तक्रार रेवदंडा पोलिस ठाणे येथे नोंदविण्यात आली आहे. दरम्यान रेवदंडा पोलिसांनी संशयीत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रायगड महिला पोलिस म्हणून रेवदंडा पोलिस ठाणे येथे पेण तालुक्यातील बार्वे येथील आरती एकनाथ पाटील या कार्यरत होत्या. त्यांनी रेवदंडा भोईवाडा येथील इमारन पावगी यांचे चाळीमध्ये वास्तव्यासाठी भाडयाने रूम घेतला होता. त्याच्या रूमच्या शेजारीमधली एक रूम सोडून संशयीत आरोपी मुमताज पिंजारी व मेहराज पिंजारी हे राहात होते. ते दोघेही नेहमी त्यांच्या रूममध्ये येत जात होते. यामधील मेहराज पिंजारी हे नेहमी त्याच्या रूममधील सामानाला हात लावत असत. त्यावेळी त्यांनी त्यास सामानाला हात लावू नकोस असे सांगायचे.

दरम्यान 23 सप्टेबर 2024 रोजी त्यांना रेवदंडा पोलिस ठाणे येथून कार्यमुक्त करण्यात आल्याने त्या गावी निघून गेल्या होत्या. इमरान पावगी यांच्या भाडयाच्या रूममधून सामान व चीज वस्तू नेण्यासाठी त्या 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याचे सुमारास आले असताना रूम उघडून आत प्रवेश केला व त्यांनी ठेवलेली पाचशे रूपयांच्या एक हजार नोटा असलेल्या 5 लाख रूपयांची रक्कम पेटीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर रक्कम शेजारील रूममधील सशंयीत आरोपी मुमताज पिंजारी व मेहराज पिंजारी यांना पेटीच्या चावीचे ठिकाण माहित असल्याने त्यांनी चोरी केली असल्याची त्यांना खात्री असल्याने त्यांनी रेवदंडा पोलिस ठाणे येथे त्यांचे विरोधात तक्रार नोंदविली.

याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305 (अ) 3(5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे हे सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत किरविले यांचे मार्गदर्शनाखाली करत आहेत.

रायगड जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरुच आहेत. काही ठिकाणी घरफोडी, सोनसाखळी चोरी, चोरी अशा घटना घडल्या आहेत. अशा चोरी आणि घरफोडीच्या गुन्हयांचा योग्य प्रकारे तपास करून छडा लावणे, त्यातील मुद्देमाल हस्तगत करणे मोठे आव्हान ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT