राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आदर्श आचारसहीता लागू झाली आहे. आचारसहित लागू झाल्या नंतर अनेक निर्बध केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले या आदर्श आचारसंहितेचा अनुषंगाने राज्य उत्पादनशुल्क ठाणे विभागाने, या आचारसंहिते निवडणुकीच्या काळात अवैध मद्याचा वापर करणार्यांवर धाडी मारून 22 दिवसात 279 गुन्हे दाखल करून एक कोटी बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे तर 180 आरोपीना अटक केली आहे. ठाणे उत्पादन शुल्काची निवडणुकीच्या काळातील सर्वत मोठी कारवाई मानली जात आहे.
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रवीणकुमार तांबे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांच्या आदेशान्वये व नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे या विभागाने विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहितेच्या अनुषंगाने अवैध मद्याचा वापर निवडणुकीत होणार नाही, या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ते 06 नोव्हेंबर 2024 या 22 दिवसाच्या कालावधीत एकूण 279 गुन्हे नोंदवून एकूण 180 आरोपीस अटक केलेली आहे तसेच 7 वाहने जप्त करण्यात आलेली आहे. या कारवाईत तब्बल एक कोटी बारा लाख रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आचारसंहिताच्या कालावधीत परराज्यातून येणार्या मद्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली असून, दमन दिव, दादरा नगर हवेली व गोवा इथून चोरट्या पद्धतीने येणार्या मद्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, परराज्यातील एकूण 1240 लीटर मद्य जप्त करण्यात आलेले आहे.
ठाणे जिल्ह्यातील अंजूर, केवणी, अलीमगर, देसाई, दिवा या खाडीतील हातभट्टी निर्मिती केंद्र तसेच मानेरा, द्वारली, घेसर या ठिकाणचे हातभट्टी निर्मिती केंद्रांवर एकूण 92 धाडी टाकण्यात आलेल्या असून हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध मद्यची वाहतूक, विक्री केंद्रे तसेच बुटलेगर वर पुढे अशीच कारवाई चालू राहणार आहे.तांबे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ठाणे